समाजभान जपणारा उद्योजक अरुण पवार : सेवा जन्मभूमी-कर्मभूमीची

दुष्काळाचा दाह सोसून अस्सल सोन्याप्रमाणे निखरुन निघालेल्या अरुण पवार यांनी संकटाला संधी समजून ध्येय गाठली. उद्योग असो वा सामाजिक कार्य जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही ठिकाणी यशस्वितेचा अरुणोदय’ घडविणारा अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

पवार कुटुंब मूळतः धारुर (ता.तुळजापूर)चे आहे. दुष्काळामुळे पवार कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड शहरात यावे लागले. परंतु येथे येऊन त्यांनी आपल्या चिकाटी आणि कष्टाच्या बळावर दोन्ही ठिकाणी मोठे बदल घडवून आणले. जिथे कधी दुष्काळ होता, आज तिथे हिरवळ दिसते आणि ज्या हातांनी कधी काम नव्हते आज ते कित्येक हातांना काम देत आहेत. या ठिकाणी उद्योग उभारुन आर्थिक दृष्ट्या सक्षमता मिळवली. मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी तुळजापूर तालुक्‍यातील बिजनवाडी, चिंचोली, धारुर, वाडीबामणी आदी भागांमध्ये तब्बल एक हजार रोपांची लागवड केली आहे. केवळ वृक्षारोपण करून ते थांबले नाहीत तर झाडांना ट्री गार्ड लावले, दर दहा दिवसाला स्वखर्चातून टॅंकरद्वारे झाडांना मुबलक पाणी दिले जाते. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वस्तीशाळा स्थापन केली आहे. या वस्तीशाळेचे रूपांतर मोठ्या शाळेत करुन त्यांचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शासकीय, सामाजिक संस्थांकडून त्यांना त्यांच्या कार्यासाठी आजवर 15 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृक्ष संगोपन, गरजूंना मदत, वारकऱ्यांना पालखी यात्रे दरम्यान संपूर्ण वारीत मोफत पाणी पुरवठा, संपूर्ण राज्यात कित्येक ठिकाणी वृक्षारोपण असे कित्येक सामाजिक उपक्रम राबवणारे उद्योजक आणि मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण श्रीपती पवार यांनी उद्योग क्षेत्रातही आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवला. अरुण पवार यांनी सामाजिक क्षेत्रात बरेच उपयोगी असे उपक्रम राबवले आहेत. वन्य प्राण्यांसाठी जंगलामध्ये 105 पाण्याच्या सिमेंट टाक्‍या ठेवून पाण्याची सुविधा, तसेच वानर, हरिण, मोरांसाठी खाद्याबरोबरच पाण्याची सुविधा, स्वच्छता अभियान, शैक्षणिक-कला-क्रीडा विषयक सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे काम सुरू ठेवले आहे. आजवर कित्येक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याला गौरवान्वित करण्यात आले आहे.

एकाच वेळी आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हींची अविरतपणे सेवा करत राहण्याचा अरुण पवार प्रयत्न करत असतात. पिंपरी-चिंचवडमधील गरजू विद्यार्थ्यांना सहाय्यता करत असतानाच मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनाही शाळेत जाता यावे, यासाठी निःशुल्क बससेवा उपलब्ध करून देणे, अशी कित्येक कामे त्यांच्या नावाभोवती आदराचे वलय निर्माण करतात.
वेगळा उद्यमी बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या व्यवसायात ही त्यांनी गुणवत्तेला प्राधान्य देत गरजूंची मदत कशी करता येईल यावर भर दिला. सध्या चऱ्होली खुर्द येथे सुरू असलेल्या त्यांच्या अभिमानश्रीफ प्रकल्पाने देखील गुणवत्तेवर नागरिकांना आकर्षित केले आहे. या प्रकल्पापासून जवळच प्रस्तावित डीपी सॅंक्‍शन रोड आहे. सध्या सदनिकांच्या वाढत्या दरांमुळे शहरात घर घेणे सर्वसामान्यांना अशक्‍य झाले आहे. सर्वसामान्यांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांच्या बजेटमध्ये बसतील अशा प्रकारचा प्रकल्प सध्या ते उभारत आहेत. सध्या स्वस्त घरे शहरापासून आणि अत्यावश्‍यक सुविधांपासून खूप दूर आहेत. त्यामुळे नागरिकांना तिथे जाऊन राहण्यात अडचण येते, ही अडचण लक्षात घेत त्यांनी प्रकल्प अशा ठिकाणी सुरू केला आहे जिथे सर्वसामान्यांना सहज घेता येऊ शकेल अशा किंमतीत सदनिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ग्राहकांच्या दृष्टीकोनातून विचार करून किचन, टॉयलेट, बाथरुम स्वतंत्र केले आहेत. सध्याच्या बजेट होममध्ये या बाबी एकमेकांशी संलग्न असतात, अशी संरचना सर्वसामान्य नागरिकांना रुचत नाही, परंतु किंमतीमुळे ते “ऍडजस्टमेंट’ करण्यास तयार होतात. त्यांना ही “ऍडजस्टमेंट’ करावी लागू नये, याची त्यांनी विशेष काळजी घेतली आहे.


अरुण पवार सांगतात की बहुतेक नागरिकांना घर घ्यायचे असते, त्यांना लोनही मिळू शकते आणि त्यांची मासिक हप्ते फेडण्याची क्षमताही असते. परंतु स्टॅम्प ड्युटी, कर आणि मार्जिन मनी इतके अधिक होते की तेवढी रक्‍कम उभी करणे सर्वसामान्यांना शक्‍य होत नाही म्हणून ते भाड्याच्या घरात राहतात. अशाही काही नागरिकांना मदत करत पवार यांच्या या प्रकल्पामध्ये त्यांनी केवळ स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनवर घर घेता येईल असा प्रयत्न देखील केला आहे. तसेच त्यांनी दरही इतके कमी ठेवले आहेत की “वन बीएचके’ चे बजेट असणारे कुटुंब देखील “टू बीएचके’ मध्ये राहू शकेल. तसेच हा प्रकल्प जिथे उभा राहत आहे, तिथे येत्या एक ते दीड वर्षांमध्ये खूप चांगला दर मिळण्याची शक्‍यता असल्याने गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प खूप चांगला मानला जात असतानाही सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या गुणवत्तेचे बांधकाम करण्यात येत असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी ईएमआय कसे पडेल याचीही विशेष काळजी घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)