समाजकल्याणतर्फे ज्येष्ठांचा जिल्हा मेळावा

सातारा – सहाय्यक आयुक्‍त समाजकल्याण, सातारा व जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती, सातारा यांच्या संयुक्‍त विद्यमाने, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून, शुक्रवार, दि. 12 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत निर्मल मंगल कार्यालयात ज्येष्ठांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) राज्य अध्यक्ष दत्तात्रय तु. चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ अधिनियम 2007 व 9 जुलै 2018 चा शासनाचा नवीन ज्येष्ठ नागरिक धोरणाचा जी.आर. यावर चर्चा करणार आहे. कार्यक्रमास जिल्हा न्यायाधिश आर. एन. लढ्ढा, जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषद सी.ओ. डॉ. कैलास शिंदे, प्रांताधिकारी श्रीमती किर्ती नलवडे, सिव्हील सर्जन गडीकर, फेस्कॉमचे राज्य अध्यक्ष चौधरी हे पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

सातारा शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त, समाजकल्याण विभाग, विजयकुमार गायकवाड, प्रा. विठ्ठलराव जाधव, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीतर्फे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)