समांतर पुलाची दुसरी बाजू डिसेंबरअखेर खुली होणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या दापोडी येथील हॅरिस पुलाला समांतर पुलाचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. पुणे शहर व इतर भागातून पिंपरी शहरात नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता हा पूल वाहन चालकांसाठी “जीवनवाहिनी’ ठरला आहे. या पुलामुळे सतत होणारी वाहतूक कोंडी बहुतांशी प्रमाणात कमी झाली आहे. तसेच, पुण्याकडून पिंपरीकडे येणारी दुसरी बाजू डिसेंबर अखेर पूर्ण करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा पूल होणे गरजेचे होते. जुन्या पुलाची रुंदी कमी असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. प्रशासनाने जुन्या हॅरीस पुलाला नव्याने समांतर पूल बांधण्याचे काम 2016 मध्ये हाती घेण्यात आले. पूल बांधताना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. अशा परिस्थितीतही प्रशासनाने पूलाचे काम वेगाने पूर्ण केले.

पिंपरीत शहरातून पुण्याकडे जाणारी एक बाजू पूर्ण झाली असल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. याचबरोबर, पुण्याकडून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या पुलाचे काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. नदीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीधारकांनी झोपड्या हटवण्यास विरोध केल्याने पूलाचे काम रखडले होते. मात्र, प्रशासनाने नुकतेच या झोपडपट्टीधारकांवर कारवाई करुन त्यांचे दुसरीकडे स्थलांतर केले आहे. यामुळे, उर्वरीत पुलाचे काम करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

बोपोडी चौक वाहतूक कोंडीमुक्‍त
नव्याने बांधलेल्या समांतर पुलासाठी चोवीस कोटी पस्तीस लाख रुपयांचे “बजेट’ मंजूर झाले होते. तसेच, पुलाच्या दोन्ही बाजूचे अंतर 402 मीटर असून रुंदी 10.5 मीटर असल्याने यावरुन वाहतूक करणे सुलभ होत आहे. तसेच, या पुलावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी प्रशस्त पदपथ तयार करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचा रस्ता ते पदपथ या दोन्हीच्या मध्यभागी संरक्षण कठड्याची उभारणी करण्यात आली आहे. या पुलामुळे बोपोडी चौक वाहतूक कोंडीमुक्‍त झाल्याबद्दल प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)