समस्या सोडविण्यासाठी नोटरींनी एकत्र यावे!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात नोटरींची संख्या शंभरवर पोचली आहे. मात्र, ही ताकद एकत्र नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना कारावा लागत आहे. या समस्या दूर करण्यासाठी या सर्व नोटरींनी एकत्र यावे, असे आवाहन महाराष्ट्र नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष एस. व्ही. तरटे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशनच्या वतीने शहरातील नोटरी व्यवसायिकांचा मेळावा पिंपरीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष पी.डी. नांगरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

त्यावेळी तरटे म्हणाले की, बऱ्याच नोटरींकडून प्रमाणपत्राचे वेळेवर नुतनीकरण केले जात नाही. प्रमाणपत्र नुतनीकरण न करता नोटरी दस्त करतात, ते बेकायदेशीर आहे. अशा दस्ताला कालांतराने न्यायालयात आव्हान केल्यास नोटरी अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे याची खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांन यावेळी केले.

पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष पी. डी. नांगरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नोटरींना भारत सरकारचे ओळखपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत, नोटरींना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.

नोटरी दीपक ओव्हाळ, सूर्यकांत सावंत, संभाजी बवले, रघुनाथ सोनवणे, मुरचंद भाट, सुजाता बीडकर, कृष्णा शर्मा, विजय भसोले, मकरंद गोखले, अशोक वायदंडे, अशोक धेंडे, विलास भोसले आदी उपस्थित होते. ऍड. दीपक ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. सूर्यकांत सावंत यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)