समस्या पांढऱ्या डागांची (भाग – १)

पांढरे कोड निर्माण होण्याची कारणे निश्‍चित सांगता येत नाहीत. जनुकदोष, प्रतिबंधक उपाय यंत्रणेमध्ये दोष, तांत्रिकाजन्य म्हणजे न्युरोजनिक दोष ही महत्त्वाची कारणे असू शकतात. कडक उन्हात हिंडल्यानेसुद्धा पांढरे डाग दिसायला लागतात. अपघात, घरात कुणाचा मृत्यू, घटस्फोटासारख्या समस्येमुळे मानसिक तणाव यामुळेसुद्धा मेलॅनिनची निर्मिती थांबते आणि पांढरे डाग दिसू लागतात.

कोड किंवा पांढरे डाग संपूर्ण शरीरावर किंवा शरीराच्या काही भागावर दिसते. त्वचेला रंग देणाऱ्या रंगपेशी मेलानोसाइटस काही कारणाने नष्ट होतात आणि त्यांची पुन्हा निर्मिती होत नाही. अशावेळेस त्वचा पांढरी पडते. मेलानोसाईटस संपूर्ण त्वचा, केसांची मूळं, मुख, डोळे आणि काही चेतासंस्थेचा भाग यामध्ये असतात.

-Ads-

कोणत्याही भागात पांढरे डाग दिसू शकतात.
उघड्या अंगावर- हात, चेहरा, गळा, डोळे, नाकपुड्या, मुख, स्तनाग्र, बेंबी, लैंगिक अवयव
घड्यांच्या जागी- काख आणि जांघ
जखमेच्या जागी- चीर, खरचटणे, भाजणे यामुळे झालेल्या जखमा
केस- अकाली पांढऱ्या झालेल्या केसांमध्ये, दाढी आणि मिशा
मस – किंवा चामखीळभोवतीची जागा

डोळ्यांचे कोपरे
लोकसंख्येच्या एक टक्‍का लोकांना पांढरे कोड होते. बहुधा वयाच्या विसाव्या वर्षांनंतर त्वचेवर पांढरे कोड दिसायला लागते. घरातल्या इतरांनाही पांढरे कोड असते. या लोकांचे आरोग्य चांगले असूनही पांढरे डाग होतात.

पांढरे डाग होण्याची काही कारणे
1. हायपरथॉयरॉडिझम किंवा हायपोथायरॉडिझम म्हणजे थायराइड ग्रंथीचे कार्य कमी होणे किंवा जास्त होणे
2. पर्निसियस अॅनिमिया म्हणजे ब-12 जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा अॅनिमिया
3. अॅडिसन डिसिज म्हणजे अॅड्रिनल ग्रंथीचे काम बिघडणे
4. अॅलोपेसीया एरीएटा म्हणजे केसाना चाईचे चट्टे पडणे
5. डोळ्यांना होणारा जंतुसंसर्ग

त्वचेला वर्ण कशामुळे येतो ?
त्वचा, केस आणि डोळे यांचा रंग मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे येतो. हे रंगद्रव्य मेलानोसाइट नावाच्या त्वचापेशींमध्ये तयार होते. जर हे मेलॅनिन कोणत्याही कारणाने तयार होऊ शकत नसेल किंवा अल्प प्रमाणात तयार होत असेल तर त्वचा एकदम पांढरी दिसू लागते. यालाच लुकोडर्मा म्हणजे पांढरी त्वचा असे म्हणतात. जोराचा मुका मार, भाजल्याच्या जखमा, त्वचेतील मेलॅनिन नष्ट करू शकतात. त्यामुळे पांढरे डाग दिसतात.

कारणे
पांढरे कोड निर्माण होण्याची कारणे निश्‍चित सांगता येत नाहीत. जनुकदोष, प्रतिबंधक उपाय यंत्रणेमध्ये दोष, तांत्रिकाजन्य म्हणजे न्युरोजनिक दोष ही महत्त्वाची कारणे असू शकतात. कडक उन्हात हिंडल्यानेसुद्धा पांढरे डाग दिसायला लागतात. अपघात, घरात कुणाचा मृत्यू, घटस्फोटासारख्या समस्येमुळे मानसिक तणाव यामुळेसुद्धा मेलॅनिनची निर्मिती थांबते आणि पांढरे डाग दिसू लागतात.

पांढरे डाग कसे तयार होतात?
मेलॅनिनच्या नाशाला सुरुवात आणि पांढरे डाग दिसण्याची सुरुवात प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळी असते. गोऱ्या माणसांमध्ये उन्हाळ्यात त्वचा रापली किंवा काळी पडली म्हणजे पांढरे डाग त्वचेवर उठून दिसतात. काळी त्वचा असलेल्यांना पांढरे डाग लगेच दिसू लागतात. एकदोन ठिकाणी दिसणारे चट्टे संपूर्ण शरीरावर पसरतात. पांढरे डाग काही भागापुरतेच राहणार की संपूर्ण शरीरावर उमटणार हे कधीच सांगता येत नाही. आजारपण आणि मानसिक ताण यामुळे पांढरे डाग लवकर पसरतात.

कधीकधी काही ठराविक भागापुरते पांढरे डाग दिसतात आणि कित्येक दिवस तिथेच राहतात. पण अचानक सगळीकडे पसरू लागतात. कधीकधी शारीरीक किंवा मानसिक ताणामुळेही लवकर पसरतात. काहीवेळा पसरणे आपोआप थांबते. असे थांबणे आणि पसरणे सतत चालूच असते.

एकदा पांढरी झालेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी कधीच होत नाही. पूर्ण शरीरभर पांढरे कोड असेल तर तरी ते अल्बीनेससारखे म्हणजे रंजकहीन सारखे दिसत नाहीत. कारण त्यांच्या डोळ्यात आणि केसांमध्ये काहीच फरक झालेला नसतो.

पांढऱ्या डागांवर मानसिकतेचा प्रभाव
त्वचेवरच्या पांढऱ्या डागांमुळे पेशंटला नेहमीच अस्वस्थ वाटते. सामान्य माणसांना त्यांची मानसिकता कशी असते हे कधीच समजणार नाही. इतर पांढऱ्या डागांचे पेशंट असलेल्यांसोबत बोलण्याने त्यांचे मन बरेच मोकळे होते.

पांढऱ्या डागांवर उपाय
त्वचेमध्ये ज्या काही शिल्लक रंगनिर्माण करणाऱ्या पेशी आहेत त्यांनी पुन्हा रंगनिर्मिती करणे आवश्‍यक आहे.म्हणजेच रंगपेशी या केसांच्या मुळाशी किंवा जखमेच्या कडांशी किंवा पांढरे डाग असलेल्या भागातूनच तयार व्हायला हव्या. त्वचेच्या एका इंचाच्या अष्टमांश भागातल्या रंगपेशीनी रंग तयार करायला सुरुवात केली तर सुधारणा होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. पण केसाचाच रंग पांढरा झाला असेल तर जखमेच्या कडांपासून निर्मिती होणे आवश्‍यक असते.

या उपायाला रिपिगमेंटेशन असे म्हणतात. या पेशंटला सोरॅलीन औषध देतात.आणि मग त्याच्यावर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मारा करतात. या किरणांमुळे सोरॅलीन कार्यक्षम होते आणि रंगनिर्मिती करणाऱ्या पेशींना चालना देते.या उपचाराचा फायदा सर्वच पेशंटना सारखाच होत नाही. हे सोरॅलीन औषध ट्रायमेथील सोरॅलीन आणि 8-मिथॉक्‍सी सोरॅलीन या स्वरूपात असते. हे औषध उन्हात बसण्याआधी किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणांखाली बसण्यापूर्वी दोन तास आधी तोंडावाटे घ्यावे लागते.

डॉ. अरुण मांडे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)