समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री बापट शुक्रवारी व्हीआयपी सर्किट हाऊसला घेणार बैठक…

पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील समस्या जाणून घेण्यासाठी उद्या (शुक्रवार दि. 25 मे) अन्न, नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश बापट व्हीआयपी सर्किट हाऊसला घेणार बैठक . दुपारी 4 ते सायंकाळी साडेसात या वेळेत ते बाजार घटकांशी चर्चा करून समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
सध्या मार्केट यार्डातील विविध घटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबतची निवेदने यापूर्वी
बाजार समिती, पणन संचालक आणि मंत्र्यांनाही देण्यात आली आहेत. तरीही अद्याप बाजारातील प्रश्‍न प्रलंबित आहेत.

याबाबत आता बापट यांनी स्वत:च जातीने लक्ष घातले आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात मार्केटयार्डात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात सहा महिन्यात प्रश्‍न सोडवूनच मार्केटयार्डात सत्कार स्विकारणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी येथील प्रश्‍नांवर एक स्वतंत्र बैठक घेवून कायमस्वरुपी तोडगा काढणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार आयोजित केलेल्या बैठकीसाठी बाजार समितीच्या अंतर्गत असणाऱ्या 25 संघटना सहभागी होणार आहेत.

यामध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशरन, दि पुना मर्चंटस चेंबर, फुल बाजार आडते असोसिएशन, तोलणार संघटना, कामगार युनियन, माथाडी ट्रान्सपोर्ट, भारतीय कामगार सेना, केळी व्यापारी संस्था, गुरांची व्यापारी असोसिएशन, पान दलाल असोसिएशन, टेम्पो पंचायत, टेम्पो संघटना, नागेश्‍वर महाराज आडते असोसिएशन, पुना डिस्ट्रीक्‍ट मोटार गुडस असोसिएशन, किरकोळ व्यापारी संघटना, पिंपरी चिंचवड व्यापारी मंडळ, भाजी मंडई व्यापारी संघटना, खडकी व्यापारी आडतदार संघटना आदी संघटना यावेळी थेट आपले प्रश्‍न बापट यांच्यासमोर मांडणार आहेत.

टपऱ्यांबाबत बापटांची भूमिका काय ?
मार्केट यार्डात सध्या वाढत्या अनाधिकृत टपऱ्यांचा विषय चर्चेत आहे. बाजार घटकांमध्ये टपऱ्यांच्या प्रश्‍नावरून नाराजी आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजार घटकंनी बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक, पणन संचालक आणि थेट पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे टपऱ्या हटविण्याची मागणी केली आहे. मात्र, बाजार समिती पळवाटा काढत आहे. मंत्र्याच्या आदेशानंतरही अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या टपऱ्या आहेत. त्यामुळे प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याची बाजार घटकांमध्ये चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गिरीश बापट टपऱ्यांबाबत काय भूमिका घेणार, याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)