समलिंगींना अमेरिकी लष्करात प्रवेश नाही – ट्रम्प

बंदी आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

वॉशिंग्टन – लष्करात समलिंगींना भरती करण्याचा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा आदेश विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिरवला असून, समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती करण्यास बंदी घातली आहे. ही सैनिकांबाबत क्रूरता असून त्यामुळे त्यांचे खच्चीकरणही होणार आहे, अशा शब्दांत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने या निर्णयावर टीका केली आहे.

ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊसने याबाबत जारी केलेल्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यात संरक्षण मंत्री, अंतर्गत सुरक्षा मंत्री यांना समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेशबंदी करण्याचा आदेश लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओबामांनी समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेश देण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार लिंगबदल शस्त्रक्रियांना परवानगीही देण्यात आली होती. बंदी आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्याची योजना 21 फेब्रुवारी 2018 पर्यंत पेंटॅगॉनने जाहीर करावी व ती 23 मार्च 2018 पासून लागू करावी असे सांगण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी लष्करात समलिंगी स्त्री-पुरुषांना प्रवेश देण्यावर बंदी घालण्याचे सूतोवाच ट्‌विटरवर केले होते. पेंटॅगॉनच्या प्रसिद्धी सचिव डॅना व्हाइट यांनी सांगितले, की संरक्षण खात्याला या बाबत व्हाईट हाऊसकडून सूचना मिळाल्या आहेत. आणखी माहिती लवकरच दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)