समर्थ परिसरात रस्त्यावर पाणी

सातारा: भीमाबाई आंबेडकर कन्या शाळेच्या गेटजवळ पाईप फुटल्याने रयत शिक्षण संस्थेच्या परिसरात पाणीच पाणी वाहत असल्याचे दृश्‍य.(छाया : अनिल वीर)

काहींना टंचाईला सामोरे जावे लागत आहे
सातारा, दि. 24 (प्रतिनिधी)- येथील बोगद्यापासून बालाजीनगर या समर्थ मंदीर परिसरात ठिकठिकाणी पाणी वाया जात आहे. त्यामुळे सोबत असणाऱ्या रहिवाश्‍यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरच पाईप लाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे. अक्षरशः आजुबाजुला कचरा असल्याने उर्वरित पाईप लाईनमधील पाण्याचा प्रवाह कसा असेल? ज्याठिकाणी एअर वॉल आहे,तिथे तर महिला कपडे धुत असतात. तेव्हा संबंधितांनी त्वरित उपाययोजना करून लोकांना शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)