“समर्थ’मध्ये राज्यस्तरीय परिषदेत 207 प्रबंध

अणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय तिसऱ्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. “सध्याच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे असलेला विद्यार्थ्यांचा कल’
या विषयावर ही परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे उद्‌घाटन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे माजी उपाध्यक्ष व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत आणि विभागप्रमुख डॉ. एस. यू. घुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेमध्ये संशोधन पेपर सादरीकरणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी – सोलापूर,शिवाजी विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर टेक्‍निकल युनिव्हर्सिटी आदी विद्यापीठांतून 207 संशोधन पेपर आणि जवळपास 357 विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परिषदेसाठी सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब गोजे, डीन डॉ. दीपराज देशमुख, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रशांत महाजन, रासेयो तालुका समन्वयक प्रा. सचिन शेळके, प्रा. राहुल राठोड उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)