“समर्थ’मध्ये मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी

अणे- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट, राजुरी (ता. जुन्नर) संचलित समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समर्थ अभियांत्रिकीच्या प्रवेशद्वारामध्ये फलक लावून मराठीतून स्वाक्षरी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विविध पुस्तकांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले होते, तसेच कथाकथन, कविता वाचन, परिच्छेद वाचन, मराठी निबंध स्पर्धा, नाट्य सादरीकरण, मराठी गाणी, मराठी अक्षर लेखन स्पर्धा आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. जुन्या मराठी ओव्या, जात्यावरची गाणी, शेतात पेरणीची गाणी यांचेही सादरीकरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य डॉ. अण्णासाहेब गोजे, प्रा. प्रदीप गाडेकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी प्रा. प्रशांत महाजन, रासेयोचे अधिकारी प्रा. सचिन शेळके, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)