समतोल दृष्टिकोनाची गरज- स्टीव्ह वॉ

ऑस्ट्रेलियन क्रिकेटसह संपूर्ण क्रिकेटविश्‍वालाच हदरविणाऱ्या या “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणी ऑसी कर्णधार स्टीव स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. या कारवाईत आजीवन बंदीच्या शिक्षेचाही विचार सुरू आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व स्लेजिंगचा एक सेनापती स्टीव्ह वॉ याने मात्र दोषींना शिक्षा देताना या संपूर्ण प्रकरणाचा “समतोल’ विचार करण्याची मागणी केली आहे. “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणामुळे आपण कमालीचे दुखावलो असल्याची पुस्ती जोडतानाच दोषी खेळाडूंकडे सूडबुद्धीने नव्हे, तर समतोल विचारबुद्धीने पाहण्याची गरज असल्याचे स्टीव्ह वॉने म्हटले आहे.

वास्तविक वॉ याच्याच कारकिर्दीत स्लेजिंगने कळस गाठला होता. ऑसी खेळाडूंच्या वागणुकीवर जगभरातून टीका झाल्यावर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह वॉ, उपकर्णधार रिकी पॉन्टिंग व महिला कर्णधार बेलिंडा क्‍लार्क यांच्या सहीने आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सहभागाने “स्पिरिट ऑफ क्रिकेट’ नावाने आदर्श वर्तणुकीसाठी एक करार करण्यात आला होता. याच कराराची आठवण स्टीव्ह वॉ याने सध्याच्या खेळाडूंना करून दिली आहे आणि केवळ कौशल्य, जुंजार वृत्ती व खिलाडू वृत्तीनेच सामने जिंकण्याचे आवाहनही त्याने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)