समता, स्वातंत्र्य ही भारतीय लोकशाहीची मोठी देण

संगमनेर – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक राष्ट्रपुरुष व स्वातंत्र्यसैनिकांनी मोठे योगदान दिले आहे. समृध्द भारतीय राज्यघटनेचा जगात मोठा लौकिक आहे. समता व स्वातंत्र्य ही भारतीय लोकशाहीची मोठी देण असल्याचे गौरवोद्गार आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. व्यंकटेश, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्रा. केशवराव जाधव, प्रा. अशोक मिस्त्रा, डॉ. लोढे, प्रा. शिरभाते, डॉ. चव्हाण, जे. बी. सेठ्ठी, एस. टी. देशमुख, प्रा. जी. बी. काळे, प्रा. बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. डॉ. तांबे म्हणाले की, अनेक भाषा, अनेक वेष, धर्म, प्रांत, वेगवेगळे असूनही सर्व भारतीयांचे मन मात्र एकच हे सर्वांनी दाखवून दिले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी माळरानावर स्थापन केलेल्या येथील सहकार कारखान्याने राज्यात लौकीक निर्माण केला आहे. देश महासत्तेच्या दिशेने दमदार वाटचाल करत असून अनेक स्थित्यंतरे झाली असती तरीही येथील लोकशाही प्रणालीवर सर्वांचा दृढ विश्‍वास आहे. समता, बंधूता व स्वातंत्र्य हे अधिकार राज्यघटनेने दिले आहेत.
याप्रसंगी प्रा. सुनील सांगळे, नामदेव गायकवाड, आदिनाथ काळे, विजय वाघे, शोभा हजारे, सीताराम वर्पे आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या सुरक्षापथक, विविध विद्यालयांमधील स्काऊट गाईड, एन.सी.सी.चे विद्यार्थी, विद्यार्थींनींनी, सुरक्षा अधिकारी नरेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली संचलन करून मानवंदना दिली. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. जिमखाना विभाग प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)