पुणे – छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दिड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटेलमेन्ट) ही योजना शासनाने आणली आहे. या योजनेखाली पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिशाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2018 ही अंतिम मुदत आहे.

राज्य शासनाने 2009-2010 पासून असलेल्या सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जून 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित करण्यात आली. तसेच यामध्ये वेळोवेळी शासनाने बदल करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दिड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिशाची संपूर्ण रक्कम जून 2018 पर्यंत बॅंकेत जमा करण्यास मुदत देण्यात दिली. या योजनेची मुदत संपुष्टात येत असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने 30 सप्टेंबर 2018 पर्यंत ही दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)