समजूतदार असण्याची क्षमता सर्वात प्रबळ 

ऍड. सीमंतिनी नूलकर 

मनुष्यप्राण्यात निरनिराळ्या बुद्धीमत्ता असतातच. त्यांचे प्रमाण कमी जास्त असते, इतकेच. या बुद्धीमत्तांना बहुविध बुद्धिमत्ता-multiple intelligence म्हणतात. या बुद्धिमत्तांचा वापर किंवा आविष्कार स्वतंत्रपणाने, एकलपणाने मनुष्य करतो किंवा एकत्रितरीत्याही करतो. म्हणजे एखादी concert च! वाद्यांचा मेळ असतो, जमतो, तसंच! 

समंजसांक- Understanding Quotient
समंजसांक म्हणजे समजूतदार असणं, ती क्षमता असणं काही Quotients पूर्णतः स्वतंत्र आहेत. काही एकमेकांशी संलग्न, संबंधित आहेत. Understanding Q- म्हणजे समंजसांक हा असाच सर्वच Quotients चा “मित्र’ म्हटला पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहवेदनांक असेल तर त्याचा अर्थ समंजसपणा आहे, म्हणून सहवेदनेची जाणीव आहे. दुसऱ्या देशाची, समाजाची, धर्माची संस्कृती वेगळी आहे. आपल्याप्रमाणेच त्या लोकांनाही त्याचा रास्त अभिमान असू शकतो. तो तसा बाळगण्याचा त्यांना हक्क आहे, हा समजूतदारपणा म्हणजे सुयोग्य सांस्कृतिक बुध्यांक! इथे सांस्कृतिक बुध्यांक आणि समंजसांक किती संलग्न आहेत, ते समजते. एकाद्या व्यक्तीचा भावनांक उच्च दर्जाचा असतो तेव्हा समजूतदारपणा असतोच. म्हणजे समंजसांकसुद्धा उत्कृष्ट प्रतीचा असतो. संकट आलंय, प्रतिकुल परिस्थिती समतोल आहे, असाध्य आजार झाला, मग “मलाच का’ “मीच का’ या घोळात न अडकता, त्यातून लवकरात लवकर बाहेर पडणं, स्वतःच्या परिस्थितीचं frustration जवळच्या व्यक्तीवर न काढता, समंजसपणा दाखवून शांतपणे तोंड देणं म्हणजेही चांगला समंजसांक! असा समंजसपणा हा स्वतःचा स्वतःशी असतो.

अशा व्यक्ती समाजाला कुटुंबाला, मित्रमंडळींना, मुला-बाळांना नकोशा होत नाहीत. त्या स्वतः gracefully जगतात. इतरांना ताप देत नाहीत. स्वतःचं जगणंही सुंदर अर्थपूर्ण असतं. इतरांनाही तसं जगण्याला, प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे उद्युक्त करताना सहकार्य करतात. रोजच्या जगण्याचा विचार केला तरी लक्षात येईल की, काही व्यक्ती चटकन मिळतं जुळतं घेतात. काही मात्र ताठर-अडेल असतात. कितीही समजावलं, वागण्याचे दुष्परिणाम फोड करून सांगितले, तरी आडगेपणा जात नाही. त्यातच भूषण, शहाणपणा वाटतो. अशा व्यक्ती खुल्या मनाच्या, खुल्या दिलाच्या नसतात. म्हणजेच त्यांचा समंजसांक कमी प्रतीचा असतो. काही व्यक्ती अडेल, आडग्या असतात. त्यांना समजावलं तर कधी कधी तात्पुरतं समजल्यासारखं करतात. पण पुन्हा “येरे माझ्या मागल्या.’ अशा, समंजसांक कमी प्रतीचा असलेल्या व्यक्तींमुळे प्रत्येक स्तरावरचे संबंध बिघडतात. दोन माणसातले, दोन राज्यातले, दोन राष्ट्रप्रमुख तसे, दोन देशातलेही. असे लोक परिणामांचा विचार करत नाहीत. त्यांना नात्यांची, माणसाच्या आयुष्याची किंमत नसते. समंजसांक जाणीवपूर्वक विकसीत करण्याचीच गोष्ट आहे.

आतापर्यंत आपण वेगवेगळ्या Quotients च्या संकल्पना पाहिल्या. बुध्यांक किंवा IQ हीच एकमेव बुद्धीमत्ता असा समज खूप वर्ष प्रचलीत होता. नंतर EQ भावनांकाला महत्त्व मिळालं. पण EQ किंवा बुध्यांक उच्च दर्जाचा असणे म्हणजेच बुद्धीमान असणे, असे नसते. बहुविध बुद्धिमत्ता या संकल्पनेचा वापर करून एखाद्या मनुष्याच्या स्वभावाचा, व्यक्तिमत्त्वाचा, वर्तनाचा लेखाजोखा मांडता येतो. म्हणजे एखादी व्यक्ती एखादी गोष्ट कशाप्रकारे समजून घेते- perceive करते, त्या व्यक्तीची आजूबाजूच्या परिस्थिती भवतालाविषयी जाणीव जागृतता, awareness किती आहे, तो कमी असेल तर का, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं मिळू शकतात. डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी प्रथम अशा सहा प्रकारच्या बुद्धिमत्तांचा पुरस्कार केला. त्यानंतर त्यांनी संशोधनानंतर आणखी काही प्रकारच्या बुद्धिमत्तांची भर घातली. डॉ. गार्डनर यांनी ज्या बहुविध बुद्धिमत्तांचा पुरस्कार केला त्या म्हणजे…

Mathematical – गणिती बुद्धिमत्ता 
Musical – सांगितिक बुद्धिमत्ता 
Bodyily – शारीरिक/कायिक बुद्धिमत्ता 
Linguistic – भाषिक/ मौखिक बुद्धिमत्ता 
Spatial-visual – दृष्य बुद्धिमत्ता 
Existential – अस्तित्ववादी बुद्धिमत्ता 
Naturalistic – निसर्गवादी बुद्धिमत्ता 
Inter personal – मनुष्याच्या परस्पर संबंधास अनुसरून असलेली बुद्धिमत्ता 
Intra personal – आत्मज्ञानाविषयीची “स्व’विषयी, बुद्धिमत्ता 

Quotients संकल्पना जशा काहीवेळा परस्परपूक, संलग्न आहेत, वाटतात; तसंच या Modalitiesचं आहे. त्याही काहीवेळा परस्पर पूरक आहेत, काहीवेळा संलग्न आहेत. इतकेच नव्हे तर Quotients आणि या Modalities यातही साधर्म्य आहे; परस्परपूरकता, संलग्नता आहे. Quotients आणि या Modalities मिळूनच “बहुविध बुद्धिमत्ता’ ही संकल्पना अर्थपूर्ण होते. बहुविध बुद्धिमत्ता ही संकल्पनाच अतिशय रंजक आहे. academic दृष्ट्या बुद्धिमान, औपचारिक शिक्षण म्हणजेच शिक्षण, त्यात उच्चतम स्तर, दर्जा गाठणे म्हणजे बुद्धिमान, असं समजण चुकीचं आहे. अशी व्यक्तीच तेवढी रूढ अर्थाने “हुशार’ इतर “ढ’. अशा प्रकारे “हुशार’ असणंच “चांगलं’ आणि अशाप्रकारे “ढ’ असणं म्हणजे “वाईट’ या समजुतीमुळे कित्येकांचे नुकसान झाले आहे. कित्येक talents वाया गेली आहेत.

एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारे बुद्धिमान आहे हे जाणून घेणं, त्या व्यक्तीचा त्या विशिष्ट अंगाने विकास व्हायला वाव देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सामान्यपणे, Reading, Writing, Arithmetic या 3R मध्येच आपण अडकून पडलेलो असतो. पण यामुळे एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन चुकीचं होतं. शिक्षण चुकीचं घेतलं जातं, नोकरी-व्यवसाय चुकीचा – नावडता निवडला जातो. एखाद्या व्यक्तीने केलेले व्यवस्थापन, किंवा त्याची करियर किंवा त्याच्या नोकरी-धंद्यातला perfomance. याचंही मूल्यमापन चुकीचं होतं. अपयशाचा शिक्का माथ्यावर बसतो. अनैसर्गिक विचार त्या व्यक्तीवर लादले जातात. त्या व्यक्तीच्या शिकण्याच्या इच्छेवर नकारात्मक, अनिष्ट परिणाम होतो.

आनंदी, relaxed व्यक्ती सहज शिकते- हसतखेळत ज्ञान आत्मसात करते. हेच जर stress असेल, न आवडणारं शिक्षण लादले असेल, तर त्या व्यक्तीच्या शिक्षणाची, करियरची आणि अंतिमतः आयुष्याची वाताहात होते. अशा प्रकारांमुळे कुटुंबावर, समाजस्वास्थ्यावर परिणाम होतो. येणाऱ्या नैराश्‍यातून, संवेदनहीनता वाढते. कशाचेच सोयरसुतक नाही अशी मनःस्थिती होते. हेच जर व्यक्ती औपचारिकदृष्ट्या बुद्धिमान नसली तरी ती संगीतक्षेत्रात, कलाक्षेत्रात उच्चतम बिंदू गाठू शकते. खेळाडू म्हणून स्वतःचं, देशाचं नाव उज्ज्वल करू शकते. बहुविध बुद्धिमत्तेपैकी कोणती बुद्धिमत्ता dominantआहे, जी क्षमता उत्कृष्ट आहे, तिचा शोध घेऊन, वापर केला तर वेगळंच, सकारात्मक काही घडू शकतं- माणसाच्या क्षमता अनेकांशी असतात. त्यांचा आविष्कार अनेक प्रकारे होतो.
माणूस शिकतो तीन प्रकारांनी, पाहून (visual) ऐकून (auditery) स्पर्शाने- kinesthetic प्रत्यक्ष हरपवश्रळपस करून- प्रत्येक व्यक्तीची शिकण्याची, आकलन करण्याची पद्धतही वेगळी असते. तीही समजून घेणं, तशी संधी त्याला उपलब्ध करून देणं, हेही फार महत्त्वाचं आहे.

(क्रमशः) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)