समगीरवाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

परिंचे- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समगीरवाडी केंद्र, वीर (ता. पुरंदर) येथील विद्यार्थ्यांना कै. संपत गोविंद समगीर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव नितीन संपत समगीर यांच्याकडून मोफत वह्या, पाटी, पट्टी, पेन,पेन्सिल आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वीर ग्रामपंचायतीचे सरपंच माऊली वचकल, उपसरपंच ऋषीकेश धसाडे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम समगीर, सारिता धुमाळ, विनायक काळभोर, नेहा काळभोर, निरंजनी समगीर, विद्या बोराडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ समगीर, सुदाम समगीर, मारुती समगीर, सोपान समगीर, सचिन मुळीक, हनुमंत समगीर, प्रकाश समगीर, सचिन समगीर, अंकुश समगीर, सूर्यकांत समगीर, अशोक समगीर यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ, सुषमा समगीर, ज्योत्स्ना समगीर, हिराबाई समगीर, पी. के.समगीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अमोल गळंगे यांनी केले,तर आभार रोहिणी गळंगे यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)