सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींचे प्रगतीपुस्तक तपासावे!

घर बचाव संघर्ष समितीची मागणी ः समस्यांची लांबलचक यादी
पिंपरी – राज्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस शनिवार शहरात येणार आहेत. राजकीय वतुर्ळात चर्चा आहे की, येत्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा एक प्रकारचा प्रचार दौराच आहे. .या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरण येथे मुख्यमंत्र्यांची सभा आहे. लोकप्रतिनिधी सभेच्या तयारीत व्यग्र आहेत, परंतु रोज वेगवेगळ्या समस्यांशी झुंजणाऱ्या या शहरासाठी लोकप्रतिनिधींनी काय केले? याचे प्रगतीपुस्तक एकदा मुख्यमंत्र्यांनी तपासावे आणि मग सभेला संबोधित करावे, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

समितीच्या वतीने याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील मोठा कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय समुदाय कित्येक समस्यांमुळे हैराण झालेला आहे. अनधिकृत घरांचा तसेच शास्तीकर प्रश्‍न, एचसीएमटीआर रिंग रोड प्रश्न, पाणीटंचाई, कचरा समस्या तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, पालिकेतील वाढता भ्रष्टाचार यामुळे पिंपरी चिंचवडकर प्राथमिक व्यवस्थेशीच झगडत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनधिकृत घरे तसेच एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रेल रोड प्रकल्प प्रश्नामुळे शहरातील सात लाखापेक्षा जास्त जनसंख्या बाधित होत आहे. यामुळे अनधिकृत घरे नियमितीकरण प्रक्रिया तात्काळ सुरू होणे आवश्‍यक आहे. शहरातील लोकप्रतिनिधी यांनी हे प्रश्न गांभीर्याने सोडविला नसल्याने नागरिकांचे आता मुखमंत्र्याच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. नगरविकास खात्याचे प्रमुख मुख्यमंत्रीच असल्याने घरे नियमितीकरणासाठी त्यांनी योग्य असा तोडगा काढावा व या प्रश्नाचे निराकरण करावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या सभेपूर्वी लोकप्रतिनिधींनी शहरातील समस्या निराकरणासाठी काय काय योगदान दिले याबाबत सर्वांचे प्रगतीपुस्तक तपासावे असे आवाहनच समितीने केले आहे.

प्राधिकरणाने दिले नाही पाच वर्षात एकही घर
गेल्या पाच वर्षात आर्थिक दुर्बल घटकासाठी प्राधिकरणाने एकही घर उपलब्ध करून दिले नाही, असे का ? या बाबतही मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खुलासा करावयास सांगावे. या सभेमध्ये दीपावली निमित्त पिपरी चिंचवड शहरवासीयांना अनधिकृत घरे नियमितिकरणाची सुखद भेट द्यावी, तसेच शास्तीकर रद्द करून शहरवासीयांची या ‘जिझिया’ करापासून पूर्णपणे सुटका करावी, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)