सभेत प्रश्‍न विचारल्याच्या रागातून दिव्यांग व्यक्तीस मारहाण

दोषींवर कारवाईची महाराष्ट्रीय अपंग विकास मंचाची मागणी
नगर – पारनेर तालुक्‍यातील जामगाव येथील दिव्यांग दिलीप कुंडलिक नाईक यांनी गावातील सहकारी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत प्रश्‍न विचारल्याचा राग धरून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्रीय अपंग विकास मंचाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना मंचाचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी दिले.
याप्रसंगी गोकुळ धाडगे, सोन्याबापू नाईक, भाऊसाहेब नाईक, सतीश नाईक, सचिन नाईक, अमोल डोंगरे, अमोल भुजबळ, योगेश मेहेर, नारायण नाईक, दीपक खळदकर, हिराबाई नाईक, मीना नाईक, अतुल गुंजाळ, मळु गाडळकर, बाळासाहेब शिंदे, उत्तम चौधरी, सागर चौधरी, अमोल मेहेर, विजय घोडके, आनंदा भुजबळ, बबन मेहेर, अप्पा मेहेर, सतीश नाईक, बाळकृष्ण नाईक, विनोद नाईक, अमोल कराळे आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब दिलीप नाईक यांनी, पारनेर तालुक्‍यातील जामगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा सुरू होती. आम्ही जामगावचे रहिवासी असून, शेतकरी कुटुंबातील आहोत. मोलमजुरी करून आम्ही गुजराण करतो. सोसायटीचे आम्ही कर्ज घेतले होते. माझे वडील दिलीप नाईक सोसायटीचे सभासद आहेत. सभेच्या अजेंड्यावरील काही विषयांवर चर्चा सुरू होती. यावेळी त्यांनी प्रश्‍न विचारला. प्रश्‍न विचारल्याचा राग धरून बाळासाहेब पोपट माळी, गणेश माळी, प्रतीक विष्णू जाधव, प्रकाश पवार या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काहीही ऐकून न घेता माझे वडील दिव्यांग दिलीप नाईक यांना जबर मारहाण केली. सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आमच्या जीवीतास धोका असून, त्यांच्यापासून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, तसेच गावकर्यांना न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)