सभासदांचे पैसे दिल्याशिवाय अंगावर गुलाल घेणार नाही

अकलूज- “श्री शंकर”च्या सभासदांचा कारखान्यावर विश्वास असून या सभासदांचा पै न्‌ पै दिल्याशिवाय अंगावर गुलाल घेणार नाही, असे प्रतिपादन डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रतापसिंह मोहिते पाटील गटाचा प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ माळशिरस येथील ग्रामदैवत मारुती मंदिरात फोडल्या नंतर श्री संत सावता माळी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये बोलताना व्यक्त केले.
यावेळी पद्मजादेवी मोहिते पाटील, डॉ. मारुती पाटील, जीवन जानकर, पांडुरंग वाघमोडे, बाळासाहेब लवटे, गौतम माने,अजय सकट, बाळसाहेब सरगर, बाजीराव माने, आप्पासाहेब कर्चे, भानुदास सालगुडे, माउली पाटील, विष्णू नारनवर, पी.ई. कुलकर्णी, अशोक तडवळकर, शामराव बंडगर, नारायण माने आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी मारुती मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते नाराळ फोडून प्रचाराचा आरंभ करण्यात आला. यावेळी बोलताना धवलसिंह म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून राज्यातील सर्वच साखर कारखाने अडचणीत आहेत. कारखान्यास अर्थ पुरवठा करणाऱ्या बॅंकेने अर्थ पुरवठा न केल्याने आणि नोटाबंदीमुळे कारखान्यास अर्थसहाय्य मिळू शकले नाही. त्यामुळे सभासदांचे देणे कारखाना देऊ शकला नाही. त्यानंतर कारखान्यावर प्रशासक नेमल्यामुळे त्याची जबाबदारी प्रशासकावर गेल्याने तो कायद्याच्या काचाट्यात सापडला; परंतु कारखान्याने सातत्याने सभासदांचे हित पाहिले असून, सभासदांचा कारखान्यावर विश्वास असून त्यास कदापि तडा जाऊ देणार नाही. वेळप्रसंगी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून सभासदांचे देणे देऊ, असा विश्वास व्यक्त करून प्रतापसिंह मोहिते पाटीलच्या गटाला विजय करण्याचे आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)