सभासदांचा विश्‍वास संपादन करण्याची गरज

केडगाव- सहकारी संस्था चालवण्यासाठी शिस्त आणि सभासदाचा विश्वास संपादन करण्याची आवश्‍यकता असून, संचालक मंडळाने त्यादृष्टीने काम करावे, असा सल्ला माजी आमदार आणि पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिला.
दौंड तालुका खरेदी-विक्री संघाची 59 वी सर्वसाधारण सभा केडगाव येथील संघाच्या कार्यालयात आज (दि. 1) झाली. यावेळी अध्यक्ष म्हणून थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार दौंड शुगर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे, सभापती झुंबर गायकवाड, उपसभापती प्रकाश नवले, रामभाऊ टुले, भाऊसाहेब ढमढेरे, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, संघाचे चेअरमन लक्ष्मण दिवेकर, धोंडिबा शेळके, माणिक राऊत, पाराजी हंडाळ, संतोष शेळके, दत्ता निंबाळकर, शिवाजी रुपनवर, संघाचे सर्व संचालक आणि सभासद उपस्थित
होते. थोरात पुढे म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार निधितून वीस लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यांच्या निधितून आणि संघाच्या माध्यमातून आपण चांगली इमारत उभी करू शकलो. अजून चांगले कामकाज करून संचालक मंडळाने पुढील वर्षी नफा वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि विश्वसनीय काम करावे. दौंड तालुक्‍यात सध्या संघाची सहा स्वस्त धान्य दुकाने, पंधरा खत विभाग, एक बियाणे आणि औषध विभाग, तसेच मुख्यालय असे मिळून तेवीस विभागानुसार काम चालते. 2017-18 या आर्थिक वर्षात संघाची एकूण उलाढाल 21 कोटी 61 लाख रुपये असून, व्यापारी नफा 64 लाख 53 हजार आहे. एकूण खर्च आणि तरतुदी वजा जाता 2 लाख 67 हजार निव्वळ नफा आहे, अशी माहिती संचालक भानुदास नेवसे, व्यवस्थापक सुहास रुपनवर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)