पिंपरी – “ते’ मंदिर जमीनदोस्त

पिंपरी – पिंपरी, दि.21 (प्रतिनिधी)- पिंपळे गुरव स्मशानभूमीनजीक बांधकाम सुरू असलेल्या अनधिकृत महादेव मंदिराचा सभामंडप बुधवारी (दि.20) कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला. याची गांभिर्याने दखल घेत, महापालिकेच्या ड-प्रभाग विभागाच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने ते मंदीर गुरुवारी (दि.21) जमीनदोस्त करण्यात आले.

दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद महापालिका मुख्यालयात उमटले. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आता प्रशासनाला धारेवीर धरले आहे. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने 16 नोव्हेंबर 2018 रोजी समस्त गावकरी पिंपळे गुरव यांना नोटीस बजावून, हे काम थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दूर्लक्ष करून, हे का सुरु राहिल्याने हा अनर्थ घडला आहे. केवळ नोटीस बजावून महापालिकेचे अधिकारी गप्प बसले होते.त्यांयावर राजकीय दबाव होता का ? असा प्रश्‍न उपस्थित करत तीन महिन्यांनंतर झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महापालिका आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हलगर्जीपणाबद्दल ठेकेदारावर गुन्हा
याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक विवेक कुमटकर यांनी फिर्याद दिली असून, बांधकाम मजुरांना सुरक्षेची कोणतीही उपकरणे न पुरविल्याबद्दल ठेकदार राहुल जयप्रकाश जगताप (वय 36, रा, पनदरे, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर अभियंत्यांनी फेटाळले आरोप
महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीचे काम सुरु असून, त्याचा बांधकामाचे साहित्य या मंदीर उभारणीकरिता वापरले जात असल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. आतापर्यंत स्मशानभूमीचे किती टक्के काम पूर्ण झाले आणि ठेकेदाराला किती बीले देण्यात आली, याची माहिती मागविली असल्याचे त्यांनी सांतिले. मात्र, अशाप्रकारच्या बांधकामाचे साहित्य मंदीर उभारणीसाठी वापरले जात असल्याची एकही तक्रार महापालिका प्रशासनाला प्राप्त झालेली नाही, असे सांगत शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी साने यांचे आरोप फेटाळून लावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)