सभापती प्रवीण माने यांचा आरोप : लाखेवाडीत खासदार सुळे यांचा गावभेट दौरा

रेडा- सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली फसवी कर्जमाफी केली, बेरोजगारांचे प्रमाण वाढले, आरक्षणाचे प्रश्‍न निर्माण झाले, संप, उपोषण करणाऱ्यांची संख्या वाढली.अंगणवाडी, शिक्षकांचे प्रश्‍नांमुळे संप होऊ लागले, दुधाचा प्रश्‍न, शेतीच्या मालाला हमीभाव यासारखे असंख्य प्रश्‍न राज्यमध्ये निर्माण झाले असून ही सरकार ढिम्म असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी केला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गावभेट विकासआराखडा घेण्यासाठी लाखेवाडी गावाला भेट दिली, त्यावेळी माने बोलत होते. यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत रणवरे पाटील, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, सागर मिसाळ, महादेव ढोले, विष्णु जाधव, राहुल आव्हाड, बबलु खाडे, किरण खुरंगे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुलींची प्रगती झाली, तर भविष्यपिढी चांगली घडणार आहे, त्यामुळे समाजाचे परिवर्तन करायचे असेल तर मुलींना शिक्षण दिले पाहिजे.वाड्यावस्तीवरील, गरजु मुलींना सायकल वाटप केले. ही संकल्पना शरद पवार यांची असून सायकल चालवताना या मुली फुलपाखरांसारख्या दिसत आहेत. त्यानंतर शरदचंद्रजी पवार विद्यालयात शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद करुन अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले.
केंद्रातून येणारी सर्व कामे तळागळातील लोकांपर्यंत पोहोचतात का नाही याचा आढावा घेण्यासाठी वर्षभर बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गाव, वाड्यावस्त्यांवर जाऊन या सर्व कामाची अमंलबजावणी होते का नाही हे पाहत आहे. देशात पुणे जिल्हा परिषदेची एक वेगळी ओळख आहे. या जिल्हा परिषेदच्या माध्यमातून ग्रामीण भागात व गावागावांत विविध सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अंगणवाडी मध्ये शिक्षण घेत असताना,विज पाणी या महत्त्वाच्या गोष्टी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहचत आहेत याचा अभिमान वाटतो.वयोश्री जेष्ठ नागरीक अशा योजना घेऊन चार हजार लोकांना त्याचा फायदा झाला आहे.
प्रवीण माने म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजना गावाला दिली. अंगणवाडी शाळा, रस्ते, वीज, पाणी,पशुवैद्यकीय दवाखाना असे अनेक प्रश्‍न येणाऱ्या काळात मार्गी लावण्यात येतील. विकासात कधीच राजकारण करणार नाही असे त्यांनी नमूद केले.

  • धनगर आरक्षणाचा शब्द या सरकारने पाळला नाही, त्यामुळे हे सरकार फसवे आहे. तसेच संघर्ष काय आहे हे आम्हाला आज कळत आहे, त्यामुळे संघर्ष केला तरच जीवनात सर्व काही साध्य होत असते. तसेच इंदापूर व बारामतीचे संबंध प्रेमाचे आहेत. जिव्हाळ्याचे आहेत येथील जनता पवार कुंटुबातीलच आहे.
    – सुप्रिया सुळे, खासदार

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)