सभापती, उपसभापतींसह सदस्यांचा बहिष्कार

वाईत पंचायत समितीच्या मासिक सभा

भुईंज – वाई पंचायत समितीचे सर्वच पदाधिकारी सदस्य आणि गटविकास अधिकारी यांना वाई तालुक्‍यातील गावांचा विकास करण्यासाठीचे पूर्वीच्या सरकारने दिलेल्या अधिकारांमुळे गावांचा विकास सहजपणे करता आला, पण सध्याच्या सरकारने सर्वच अधिकार काढून घेऊन पंचायत समितींचे अस्तित्वच भुईसपाट करण्याचा घाट घातल्याच्या निषेधार्थ पदाधिकारी सदस्य यांनी दरमहा होणाऱ्या बैठकांवर सामुदायिक बहिष्कार घातला आहे. तसेच निवेदनही वाईच्या प्रांताधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले असल्याची माहिती सभापती सौ. रजनीताई भोसले यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवेदनात म्हटले आहे की, पूर्वीच्या सरकारने राज्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या पदाधिकारी यांना तालुक्‍यातील गावांचा विकास करण्यासाठी लागणारा निधी थेट पंचायत समितीकडे पाठवला जायचा. त्या निधीतून गावांच्या आवश्‍यक मागणीनुसार गावांची विकासकामे करुन नावलौकिक प्राप्त केला होता, अशा केलेल्या चांगल्या कामांची दखल केंद्र आणि राज्य सरकारने घेऊन वाईसह सातारा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याच्या नोंदी खुद्द शासकीय दप्तरात आढळून येतात.

दरम्यान, राज्यातील बहुतांशी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, मात्र ही गोष्ट सध्याच्या सरकारला खटत असल्याने युतीच्या सरकारने आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या पदाधिकारी याचे अधिकार काढून घेऊन गावागावांच्या विकासकामांना खिळ घातली आहे. सरकारच्या या धोरणांचा वाई पंचायत समितीचे सभापती सौ. रजनी भोसले पाटील, उपसभापती अनिल जगताप, सदस्य भैय्या डोंगरे, सौ. सुनिता कांबळे, मधुकर भोसले, संगीता चव्हाण, दीपक ननावरे, सौ. ऋतुजा शिंदे या पदाधिकाऱ्यांनी आज वाईच्या प्रांताधिकारी सगीता चौगुले राजापूरकर आणि तहसिलदार रमेश शेंडगे यांना निवेदन देऊन जाहीर निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)