सभापतींचाच सभेवर बहिष्काराचा इशारा

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्याकडे या विभागाबरोबरच भांडार, सुरक्षा आणि अतिरिक्त आयुक्‍त पदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विकास विभागाचे कामकाज वेळेत होत नसल्यामुळे लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या विभागासाठी स्वतंत्र सहायक आयुक्ताची नेमणूक करावी अन्यथा महिला व बालकल्याण समितीच्या पुढील सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सभापती सुनीता तापकीर यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्याकडे नागरवस्ती विकास योजना विभागाचा अतिरिक्त पदभार आहे. याशिवाय त्यांच्याकडे भांडार, सुरक्षा विभागाबरोबरच अतिरिक्त आयुक्त पदाचाही अतिरिक्त पदभार आहे. नागरवस्ती विकास योजना विभागामध्ये अष्टीकरांसाठी स्वतंत्र केबीन देखील आहे. मात्र, अष्टीकर या विभागामध्ये बसतच नाहीत. महिला बालकल्याण विभागाचे कामकाज नागरवस्ती विकास योजना विभागातूनच केले जाते. महिलांशी संदर्भात योजनांचा लाभ व अर्ज घेतल्यानंतर अंतिम यादी तयार करण्यापासून ते लाभार्थ्यांना लाभ देण्यापर्यंतचे कामकाज या विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनाच करावे लागते. मुळात अष्टीकरांची यासाठी नेमणूक असताना त्यांच्याकडून वेळेत काम होत नसल्याचा अनुभव आहे. त्याचा त्रास मात्र, सर्वसामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

-Ads-

महिला बालकल्याण हा स्वतंत्र विभाग निर्माण करून त्यावर महापालिका सेवेतील शैक्षणिक अर्हताधारक कर्मचाऱ्याची सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने यापूर्वीच दिले आहेत. तरीही, पालिकेत या विभागाचे कामकाज स्वतंत्र न चालविता नागरवस्ती विकास योजना विभागातून चालविले जाते. तसेच, समितीच्या प्रत्येक बैठकीत शहरातील विविध घटकातल्या लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात महत्वाचे निर्णय घेतले जातात. हे निर्णय होताना नागरवस्ती विकास योजना विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अष्टीकर उपस्थित नसतात. त्यामुळे बैठकीत होणाऱ्या निर्णयावर प्रत्यक्ष कार्यवाहीचा अभाव आहे. याकरिता महिला व बालकल्याण विभागात स्वतंत्र सहायक आयुक्त नियुक्त करावा, अन्यथा समितीच्या पुढील बैठकीत यावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा सभापती तापकीर यांनी निवेदनाद्वारे आयुक्त हर्डीकर यांना दिला आहे.

डॉ. अष्टीकरांवर कामाचा भार
नागरवस्ती विकास योजना विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर हे शासनाचे अधिकारी आहेत. नागरवस्ती विभागात अनुभवी व शैक्षणिक अर्हतेनुसार समाज विकास अधिकारी सहायक आयुक्त पदासाठी पात्र ठरतात. मात्र, पालिकेतील प्रशासनाने जाणुनबुजून अष्टीकर यांना या विभागाबरोबरच अन्य तीन विभागाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यांच्याकडे बाकीया विभागांतील कामकाज सर्वाधिक असल्याने त्यांना या विभागाकडे लक्ष देता येत नाही. त्याचा परिणाम थेट लाभार्थ्यांवर होत आहे. एखाद्या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी लाभार्थ्यांना पालिकेचे उंबरठे झिजवावे लागतात. पालिकेतील काही महत्वाच्या विभागांवर जाणुनबुजून शासनाचे अधिकारी लादले जातात. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)