सब कॉन्ट्रॅक्‍टरवर प्राणघातक हल्ला

वाघोली – केसनंद-भंडलकरवस्ती रस्त्यावर राधास्वामी कंपाउंड जवळ सब कॉन्ट्रॅक्‍टरवर दुचाकी व चारचाकीतून आलेल्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी 9 च्या सुमारास घडली. राजकीय वैमनस्यातून हल्ला केला असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सागर सुखदेव तांबे (वय 28, रा. तांबेवस्ती, केसनंद) असे हल्ला झालेल्या सब कॉन्ट्रॅक्‍टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर तांबे दुचाकीवरून निघाले होते. ऍक्‍टिवा व पल्सर दुचाकीवरील चौघांनी तोंडाला रुमाल बांधून तांबे यांना अडवून हॉकीस्टीकने मारहाण केली. तसेच झेन चारचाकीमधील पाच जणांनी कोयता, चाकू मारण्यासाठी आणला होता. मारहाण करण्यासाठी लोक येऊ लागल्याने तांबे पळत होते. पुढे शेतात काम करणारे ग्रामस्थ तांबे याच्या मदतीसाठी धावून आले व मारेकऱ्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. गोंधळामध्ये मारेकरी पसार झाले असले तरी पल्सर दुचाकी त्याचठिकाणी राहून गेली. ग्रामस्थांनी दुचाकी पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सागर तांबे हे माजी सरपंच प्रणाली तांबे यांचे दीर आहेत. केसनंदच्या सरपंच पदाच्या निवडणुकीबाबत तांबे यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे की, कॉन्ट्रॅक्‍ट व्यवसायातून हल्ला झाला आहे याचा तपास पोलीस करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)