“सबॉर्डिनेट इंजिनिअर्स’ पतसंस्थेची सभा खेळीमेळीत

पुणे – सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन या अभियंत्यांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहात नुकतीच पार पडली.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता मल्लेशा शिंदे, महावितरणच्या ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, पतसंस्थेचे अध्यक्ष उदय साठे, उपाध्यक्ष प्रसन्न चित्रे, सचिव शिवाजीराव लाड, खजिनदार मृदुला शिवदे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी पतसंस्थेच्या वतीने सिंधुताई सकपाळ यांच्या संस्थेला एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. शिंदे आणि पवार यांच्या हस्ते सेवानिवृत्त अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. मृदुला शिवदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सागर चिरके यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)