सबळ पुराव्यांअभावी एकाची निर्दोष मुक्‍तता

पुणे – विनयभंगाच्या आरोपातून 50 वर्षीय व्यक्तीची सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.टी.गोटे यांनी हा आदेश दिला.

अरविंद अनंतराव पोटेगावकर (रा. सोरतापवाडी) असे मुक्तता झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. श्रीकृष्ण घुगे यांनी काम पाहिले. फिर्यादी महिला कोरेगाव पार्क येथील ऑफिसमध्ये हाऊस किपिंगचे काम करत. पोटेगावकर तेथे फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्या ऑफिसमधून 29 ऑक्‍टोबर 2014 रोजी फिर्यादी महिलेला अचानकपणे कामावरून कमी केले होते. त्यामुळे फिर्यादीने पोटेगावकर यांना कामावरून का कमी केले, अशी विचारणा केली. मात्र, पोटेगावकर यांनी याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये कामावर घेण्यासाठी पोटेगावकर याने फियादीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पोटेगावकर याच्यावर भारतीय दंड संहिता 354 (विनयभंग) नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र, बचाव पक्षाचे वकील ऍड. श्रीक़ृष्ण घुगे यांनी सबळ पुरावा नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने पोटेगावरकर याची निर्दोष मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)