सबनीस महाविद्यालयाचे रासेयो शिबीर उत्साहात

नारायणगाव- राष्ट्रीय सेवा योजनेतून ग्रामीण जीवनाची माहीती मिळते, समाज जीवनातील चढ-उतार समजतात, त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे गावागावांत होणे गरजेचे आहे, असे उद्‌गार मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी काढले. ग्रामोन्नती मंडळाच्या गुरूवर्य रा. प. सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर शिरोली (कारखाना) येथे उत्साहात झाले, या शिबिराच्या समारोपावेळी ते बोलत होते.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सरपंच मीना उकिर्डे, उपसरपंच नितीन थोरवे, पोलीस पाटील अमोल थोरवे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप थोरवे, मुख्याध्यपक रवींद्र वाघोले, एच. पी. नरसुडे, प्रा. जी. डी. मंडलिक, प्रा. एस. एस. गाळव, प्रा. एस. ए. देशपांडे, प्रा. ललिता व्यवहारे, कैलास खैरे उपस्थित होते. शिबिर काळात प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. त्यात मानवतेचे पुजारी – प्रा.मधुकर एरंडे आरोग्याची गुरूकिल्ली ः स्वच्छता – प्रा. श्रीकांत फुलसुंदर, भाजीपाला लागवड व्यवस्थापन – प्रा. बी. जी. टेमकर, कथाकथन – अनुपमा पाटे, कवी संमेलन – संदीप वाघोले, विलास हाडवळे आणि शशांक जोगळेकर यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. शिबिरात ग्राम सफाई, रस्ता बांधणी, सांस्कृतिक संवर्धन, व्यक्तिमत्व विकास, आरोग्य संवर्धन, वृक्षलागवड, जल संवर्धन आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन प्रा. संतोष देशपांडे यांनी के, तर आभार प्रा. साहेबराव गाळव यांनी मानले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)