“सबनीस’च्या वृषल बेल्हेकरची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

नारायणगाव- येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्या मंदिरातील वृषल रमेश बेल्हेकर याची 17 वर्षांखालील शालेय मैदानी लांब उडी आणि तिहेरी उडी क्रीडा स्पर्धेसाठी पटना (बिहार) येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी दिली. कऱ्हाड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत वृषलने लांब उडी आणि तिहेरी उडी या मैदानी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी मुकुट संपादन करून राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या तिहेरी उडीत “खेलो इंडिया’ या क्रीडा स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. क्रीडा शिक्षक भीमराव पालवे, राहुल नवले, बबन गुळवे, तुळशीदास कोऱ्हाळे, साहेबराव गाळव, कावजी भवारी, बाबासाहेब वळकुंदे यांनी त्याला मार्गदर्शन केले. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)