सबका साथ सबका विकास संकल्पनेवर राज्याचा विकास- मुख्यमंत्री

हजरत सुफी मखमल पीर यांच्या ‘कामील ए इमान पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई: सर्वांच्या साथीनेच विकास झाला तर देशाची प्रगती होईल. त्यामुळे सबका साथ सबका विकास ही संकल्पना घेऊन आम्ही समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन राज्याचा विकास करीत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मखमली पीर सुफी संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. दी फाईन आर्ट सांस्कृतिक केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते हजरत सुफी मखमल पीर यांच्या ‘कामील ए इमान’ हिंदी आवृत्तीच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये निस्वार्थ मनाने देवाची आणि वडीलधाऱ्या माणसांची सेवा केली जाते, त्याचप्रमाणे सुफी परंपरेमध्ये माणसांना जोडायचे काम केले जाते. या परंपरेत प्रेम आणि माणुसकीचे दर्शन घडते. देशातील सर्व समाजातील गरिबी, शिक्षणाचा अभाव दूर करून त्यांना चांगले आयुष्य जगण्यास मिळावे यासाठी शासनामार्फत सर्वतोपरीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासात हातभार लावला पाहिजे. आपल्यातील देवाला जिवंत ठेवले की, आपल्या हातून चांगले कार्य घडत असते आणि समाजाला आपण एका चांगल्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)