सफाई कामगारांना खुष खबर!

  • सागर चरण : अपघात वीमा योजना लागू

पिंपरी – शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2018 पासून “समूह वैयक्‍तीक अपघात विमा योजना’ लागू करण्यात आला आहे. हा विमा दहा लाखांचा आहे. याचा महापालिकेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत होती. अनेक कर्मचारी सुरक्षेची पर्वा न करता कचरा जमा करतात. घंटागाडी वाहनामध्ये कचरा बसत नसल्यामुळे जिवाची पर्वा न करता लोंबकळत पोती बांधून घेवून जातात. यामुळे अनेक स्वच्छता कर्मचारी जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. कर्मचाऱ्यांना मानधनही तुटपुंजे असते. त्यामुळे कर्मचारी योग्य उपचार घेऊ शकत नाहीत. आरोग्य विभागाच्या तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनी महापालिकेकडे त्यासाठी आरोग्य विमा लागू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आले.

पालिका कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी पत्र पाठवून अपघात विमा लागू केल्याचे कऴवले आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या वारस मुलांना 30 दिवसांत नोकरी मिळेल. उबदार कपडे, 12 साबण, 6 नप्किन, बूट, मास्क व इतर समस्याचे देखील निराकरण करण्यात आले.
– ऍड. सागर चरण, उपाध्यक्ष, सफाई कामगार तक्रार निवारण समिती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)