सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी घंटानाद

पिंपरी – कंत्राटदाराकडून सफाई कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करत जनरल माथाडी कामगार संघर्ष सेनेच्या वतीने दापोडी चौकात बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दापोडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष गोपाळ मोरे यांनी केले. यामध्ये राजाभाऊ वाळुंजकर, अजय मोरे, अमोल साळवे, शंकर कांबळे, राजकुमार परदेशी, गुलजार कुरेशी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका प्रशासन व परफेक्‍ट फॅसिलिटीज सर्व्हिसेस या कंत्राटदाराकडून कामगार कायदा धाब्यावर बसवून सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. या कर्मचाऱ्यांना कोणतीही साधने पुरविली जात नाहीत, असा आरोप संघटनेने केला आहे. कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे.

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे. भविष्यनिर्वाह निधी कायद्याप्रमाणे ईपीएफ कंत्राटदाराने द्यावा. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधेअंतर्गत इएसआय कार्ड देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे समान काम, समान वेतन मिळावे, शासन निर्णयाप्रमाणे महागाई भत्ता, धुलाई भत्ता देण्यात यावा, कामगारांना सुरक्षा साधने मिळावीत आदी मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)