सफाई कामगारांचे पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) – सातारा पालिकेत अध्यक्षीय समितीने सुचवलेल्या कामगारांची यादी डावलण्यात आल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी सातारा पालिकेच्या प्रवेशद्वारावर चार वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, सायंकाळी पालिकेची वेळ संपताना कर्मचाऱ्यांनी आत्मदहन आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पोलिसांची धावपळ झाली. कामगारांनी लेखी हमी देण्याची मागणी केल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी या प्रकरणाचा चेंडू पदाधिकाऱ्यांच्या कोर्टात टोलवत हात वर केले. अनुकंपा तत्वावरील सफाई कामगारांच्या भरतीचा प्रश्न अद्यापही चिघळलेला आहे. कामगारांच्या उपोषणामुळे पदाधिकाऱ्यांना मध्यस्थी करण्याची वेळ आली. मात्र, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकाऱ्यांनी अंतिम केलेली 16 सफाई कामगारांची यादी कायम करण्यात येवून अध्यक्षीय समितीने सुचवलेली सोळा जणांची यादी फेटाळण्यात आली. या संतप्त कामगारांनी शुक्रवारी संध्याकाळी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये हुज्जत घालायला सुरवात केली. मात्र, चर्चा निष्फळ झाल्याने कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दारातच ठिय्या दिला. कोणताच मार्ग निघत नाही म्हणून कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कामगारांना मज्जाव केल्यानंतर आंदोलन बारगळले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)