सफाई कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी

पिंपरी- दैनंदिन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात नाही. यंदा ठेकेदारांकडून त्यांना बोनस द्यावा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. प्रल्हाद कांबळे, मंगल जाधव, वंदना साळवे, सविता लोंढे, मंगल कसबे, अनिता ससाणे, प्रविण महाडिक, माया कांबळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. निवेदनात नमूद केले आहे की, दैनंदिन साफसफाई करणारे दीड हजार कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना नियमानुसार व अटीनुसार बोनस देणे बंधनकारक आहे. मात्र एकाही ठेकेदाराकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. सर्व कामगारांना पीएफ व किमान वेतनाचा फरक देण्यात यावा. पिंपरी-चिंचवड शहरातील सफाई कामगारांना वायसीएम रुग्णालयामध्ये मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात. कामगार रस्त्यावर काम करीत असल्याने अनेक कामगारांना आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार ठेकेदारांनी सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यासाठी सुचना कराव्यात. कामगारांना येत्या दिवाळीला बोनस न दिल्यास कामगारांसह तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)