सफाई कर्मचाऱ्यांच्या गौरवाला वर्धापन दिनाचा मुहूर्त

पिंपरी– महापालिकेचे आरोग्य समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका सेवेतील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त प्रशासनाने शोधून काढला आहे. उद्या (दि. 11) 16 सफाई कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर पाच हजार सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जात नसल्याची तक्रार महापालिकेचे आरोग्य समिती उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगारोबरच राष्ट्रीय अनुसुचित जाती व जमाती आयोग तसेच केंद्रीय सामाजिक व न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली होती. याची सर्वच आयोगांनी गांभिर्याने दखल घेत, राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना या प्रकरणाचा 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

-Ads-

सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची केंद्रीय पातळीवर दखल घेतल्यानंतर, सप्टेंबर महिन्यात होणारा सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा सोहळा महापालिका वर्धापन दिनी घेतला जाणार आहे. कधी नव्हे ते या सत्कार सोहळ्याचे विशेष परिपत्रक प्रशासन भिागचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी काढले आहे. विशेष म्हणजे या परिपत्रकामध्ये आठ प्रभाग कार्यालयातील एक महिला व एक पुरुष अशा एकूण 16 सफाइर कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

खऱ्या अर्थाने शहराचे आरोग्य सांभळणाऱ्या सुमारे पाच हजार सफाई कामगारांमधून केवळ 16 कर्मचाऱ्यांचा सत्कार करत, महापालिका प्रशासनाकडून अन्य कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चकरण केले जात आहे. हा सत्कार केवळ दिखाऊपणा आहे. या सत्काराबरोबरच या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या महापालिका प्रशासनाने पूर्ण कराव्यात. त्यामध्ये स्वाईन फ्ल्यू लसीकरण, सुरक्षेची साधने व निवासस्थानाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. ही बाब सर्व आयोगांच्या निदर्शनास आणून देणार आहे.
ऍड. सागर चरण, उपाध्यक्ष, आरोग्य समिती, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)