सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर “वॉच’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर आता सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांचा वॉच असणार आहे. हजेरीच्या ठिकाणी अचानकपणे भेट देऊन ते सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजाची तपासणी करणार आहेत. प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी हे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या हद्दीतील साफसफाई करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाकडून केले जाते. महापालिका कार्यक्षेत्राचा वाढलेला क्षेत्रविस्तार, प्रशासकीय आव्हाने, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी प्रकल्प अशा विविध योजना विचरात घेऊन, उपलब्ध मनुष्यबळाचा वापर केला जातो. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित दैनंदिन कामकाजासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात.

सफाई कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. सफाईचे कामकाज महत्त्वाचे असून, या कामकाजाची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी वेळोवेळी अचानकपणे सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासन अधिकारी व सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी 15 दिवसांतून एकदा अचानकपणे ही तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, या भेटीचा अहवाल प्रशासन विभागाकडील तपासणी पथकाडे सादर करावयाचा आहे. या भेटीमध्ये शिस्तीचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या देखील सूचना केल्या आहेत.

-Ads-

आधी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण करा!
महापालिकेच्या सर्व विभागांमधील कर्मचारी कार्यक्षम असून, केवळ सफाई कर्मचारी चांगले काम करत नसल्याचे या परिपत्रकावरुन दिसून येते. या अचानक तपासणीला देखील आमचा विरोध नाही. मात्र, गेली अनेक वर्षांपासून याच सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत; त्या मागण्या पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडे आहे का, असा सवाल महापालिका आरोग्य समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनी केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)