सफाई कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्‍यात

साधने पुरवण्यास दिरंगाई : महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

पिंपरी – शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे व मास्क नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध सुविधा पुरविण्यासाठी पालिका ठेकेदारांना पैसे पुरविते, परंतु, काही ठेकेदार सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्यास दिरंगाई करत असल्याचे दिसून आले आहे.

-Ads-

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येते, तसेच, काही ठिकाणी डंपरमधून कचरा गोळा केला जातो. काही कारणास्तव नागरिकही रोजच्या-रोज कचरा टाकत नसून तो घरात साठवून ठेवतात. त्यामध्ये, शरीराला घातक किडे, मुंग्या, अळ्या, माश्‍या तयार झालेल्या असतात. काही ठिकाणी कचरा गोळा करणारे कर्मचारी मोजे किंवा मास्क न घालताच हॉटेल व्यवसायिक तसेच नागरिकांनी दिलेला कचरा डंपरमध्ये बसून वेगळा करतात. कचऱ्यामध्ये काम करताना कामगारांनी सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक असते. परंतु, ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे ही साधने कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचे उघड झाले आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका पोचण्याची शक्‍यता आहे. तसेच, काही ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवित असूनही ते वापरत नसल्याचे आढळून आले आहे. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याबाबत त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवित नसल्याने ठेकेदारावर महापालिकेने तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. याचबरोबर पहाटेच्या सुमारास जागोजागी रस्ता साफ करणारे कर्मचारीही स्वत:जवळील रुमाल किंवा फडके तोंडाला बांधून साफसफाई करताना दिसत आहे. यामध्ये, प्रशासनाने लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे. सफाई कर्मचारी मानधन तत्वावर भरले जात असल्याने ज्या सुविधा मिळतील त्या कोणतीही ओरड न करता घेत असल्याने हा प्रश्‍न ऐरणीवर येत नाही. महापालिकेच्या संबंधित विभागाने सफाई कर्मचाऱ्यांना आवश्‍यक सुविधा पुरविणे नियमाने बंधनकारक आहे. यामुळे, साफ-सफाई करताना कचरा वेचकांना सुविधाअभावी आरोग्यास हानी पोचल्यास जबाबदार कोण असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे व मास्क पुरविणे बंधनकारक आहे. ज्या प्रभागातील ठेकेदार मास्क पुरवित नाही अशा ठेकेदारांवर दंडाची कारवाई केली जात आहे. तसेच, काही ठिकाणी मास्क पुरवूनही कर्मचारी वापर करत नाहीत त्या कर्मचाऱ्यांवरही ठेकेदार दंड करत असल्याने बहुतांशी प्रमाणात साफ-सफाई करताना कर्मचारी हातमोजे व मास्कचा वापर करतात. तसेच, प्रभागात मास्कचे वाटप केल्यानंतर त्याचे फोटो व सही ठेकेदाराकडे असणे बंधनकारक केले आहे.
                                                                 – मनोज लोणकर,                                सहाय्यक आयुक्‍त, महापालिका आरोग्य विभाग

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)