सफाई कर्मचारीच करतात प्लॅस्टिक कचरा विक्री

महापालिकेचे “कुंपणच शेत खात’ असल्याचा प्रकार

पुणे – प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात महापालिकेला नाकीनऊ आले असताना कर्मचारी मात्र प्लॅस्टिक कचऱ्याची सर्रास विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे, तर हा कचरा विकून ते पैसे वाटून घेण्याचा हा त्यांचा जोडधंदाच झाला असून, “कुंपणच शेत खाते’ असा प्रकार या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झाला आहे.

उरूळी देवाची येथील कचरा डेपोवर वारंवार होणारी आंदोलने तसेच नाशवंत कचऱ्याशिवाय प्लॅस्टिक, इ-वेस्ट, सॅनिटरी नॅपकिन, कारकस कचऱ्याचा प्रश्‍न भीषण आहे. याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला स्वतंत्र कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावे लागणार आहेत. तो प्रयत्न सुरू असताना, कचऱ्याचे वर्गीकरण करतानाच सफाई कर्मचारी प्लॅस्टिक बॉटल आणि प्लॅस्टिकच्या इतर वस्तू कचऱ्यातून काढून ते भंगार व्यावसायिकांना विकत आहेत.

हा प्रकार भवानीपेठ आणि अन्य पेठांमध्ये सर्रासपणे सुरू आहे. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी आहे. या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो. त्यामुळे घंटा वाहनांमध्येही मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. या कचऱ्यामधील जवळपास सर्वच कचऱ्याचे वर्गीकरण ओला आणि सुका स्वरूपात होणे आवश्‍यक आहे. मात्र, यातील केवळ प्लॅस्टिक कचरा हे कर्मचारी वेगळा करतात आणि तो भंगारच्या दुकानात विकतात. त्यातून आलेले पैसे हे कर्मचारी आपापसांत वाटून घेतात.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना महापालिकेने “पेट बॉटल्स’ ही संकल्पना राबवली होती. यामध्ये प्लॅस्टिक मुक्त शहर करणयचा नारा आयुक्तांनी दिला होता. असे असताना या संकल्पनेला कर्मचारीच हरताळ फासत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकाराला नक्की कोण खतपाणी घालत आहे, कोणा अधिकाऱ्याचे याकडे लक्ष कसे काय जात नाही, असा प्रश्‍न आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)