“सफलता’वर नोंदणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार

आनंद रायते यांची माहिती ः ऑनलाइन अर्जात तफावत आढळल्यास प्रवेश रद्द
 
पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी यंदाच्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी “सफलता’ या संकेतस्थळावरून ऑनलाइन करावयाचे आहे. त्यासाठी महाविद्यालयांना या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. मात्र, बहुतांश महाविद्यालयांनी नोंदणी केलेली नाही. नोंदणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सचिव आनंद रायते यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश पडताळणी यंदापासून ऑनलाइनद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी प्राधिकरणाच्या www.safalta.org या संकेतस्थळावर महाविद्यालयांनी नोंदणी करणे नोंदणी बंधनकारक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांचे प्रवेश पडताळणी प्रक्रिया करणे शक्‍य नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करताना आणि प्रत्यक्ष प्रवेश घेताना सादर केलेले सर्व प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने पडताळणी करण्यात येत आहे. त्यात तफावत आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होऊ शकते. ऑनलाइन पडताळणीमुळे बोगस कागदपत्रे दाखवून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा चाप बसला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांना यापूर्वीच संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, बहुतांश शासकीय, महानगपालिका, अनुदानित, खासगी विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमाची महाविद्यालये नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रवेश नियामक प्राधिकरणने अखेरचे परिपत्रक प्रसिद्ध करून आता नोंदणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

 दंड भरण्याच्या अटीवर मुदतवाढ

नोंदणीसाठी संबंधित महाविद्यालयांना शेवटची संधी म्हणून दि. 12 ते 21 जानेवारीपर्यंत 50 हजार रुपये दंड भरण्याच्या अटीवर मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. जी महाविद्यालये नोंदणी करण्यास असमर्थ असतील, त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य अथवा अधिष्ठांना शासनाकडे अहवाल पाठविले जाईल. पुढच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही रायते यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)