सफर…!!

दिवाळी जवळ आली की आम्हां सर्वांना हुरहुर लागते ती म्हणजे दीपोस्तवाची. दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी पण दीपोस्तव साजरा करण्यासाठी मूली खुप उत्साही होत्या. पण दीपोस्तवाचा विषय काय? हा खुप मोठा प्रश्न समोर उभा होता. शेवटी सर्वानुमते “सफर…” हया विषयावर शिक्कामोर्तब झाली. विषय तर ठरला पण आता वेळ होती ती रांगोळ्या ठरवण्याची.

दीपोस्तवाबाबत सांगायचं झालं तर यात आम्ही रांगोळ्या तर काढतोच पण त्याच बरोबर रांगोळ्या मार्फ़त मांडलेल्या विषयाचे सादरिकरण सुद्धा करतो. जसे दीपोस्तवाचा ह्या वर्षीचा विषय “सफर..” हा होता. आयुष्याच्या सफर ची सुरुवात लहानपणापासून होते. म्हणून आमची पहिली रांगोळी ही “लहानपण देगा देवा” जिच्या मध्ये आम्ही हसतं-खेळतं, बंधने नसलेलं निरागस असे बालपण अनुभवनारा लहान मुलगा दाखवला होता. जो कगदाची का असेना पण स्वताची तीन-चार जहाज पाण्यात सोडत होता.

पुढची आयुष्याची पायरी म्हणजे किशोर वय, ज्या वयात आपल्याला असंख्य प्रश्न पडलेले असतात. ज्या वयात शारीरिक आणि मानसिक बदल घडून येतात. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची जर आपल्याला योग्य अशी उत्तर मिळाली तर मातीचे मड़कयामध्ये रूपांतर व्ह्यायला वेळ लागत नाही. म्हणूनच दुसऱ्या रांगोळीचे नाव “थोडं बोलायचयं..” असे ठेवण्यात आले होते.

त्यानंतर येते ते म्हणजे तारुण्य, ज्या वयात आपले मन हे सतत गोंधळलेले असते म्हणून तीसऱ्या रंगोळीला नाव “इधर चला में उधर चला” असे दिले गेले.ह्या वयात आपल्या समोर खुप आकर्षणं असतात पण  फुलपाखरु रूपी मनाने ठरवायचे की आकर्षण रूपी लाल कोरफडाच्या फुलावर बसायचे की साधे दिसणारे पांढरे फूल निवडायचे.

त्यांनंतरचा आयुष्याचा टप्पा म्हणजे लग्न. आजकाल सगळीकडेच विभक्त कुटुंब पद्धती बघायला मिळते, आई बाबा दोघेही जॉब करणारे मग अश्या वेळेस मुलांना कुठे ठेवायचे? यालाच आयुष्य असे म्हणतात म्हणूनच चौथ्या रंगोळीेला नाव “यासी जीवन ऐसे नाव..” दिले गेले.

शेवटची रांगोळी पण आयुष्याला नवीन कलाटनी देणारी, वृद्धापन असे वय ज्या वयात आपण निवांत असतो. पण अश्याच वयात मागे वळून बघताना जाणवते की माझे कुठे तरी जगायचे राहून गेलंय का? जर असे वाटत असेल तर पुन्हा एकदा नवीन उमेदिने, पुन्हा एकदा जगायचे शिकुया.

अश्या प्रकारे जिंदगी ची “सफर” रांगोळ्या मध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. समाजात बदल करण्याची ताकद कदाचित आमच्यात नसेल परंतु ‘सफर’ ह्या रांगोळीने आम्हाला जिंदगीची सफर ही हसत्या-खेळत्या, खळ-खळत्या झाऱ्यासारखी असावी हे मात्र शिकवले.

– प्राजक्ता जाधव 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)