सफरचंद “घसरले’

पिंपरी – पिंपरीतील फळ बाजारात सफरचंदाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून 2 किलो सफरचंद 100 रूपयाला मिळत असल्याने नागरिकांकडून सफरचंदाच्या मागणी वाढत आहे. सफरचंदाचे बाजारात सध्या तीन प्रकार विक्रीसाठी आहेत. यामध्ये लहान आकारातील गुणवत्ता कमी असलेले 50 रुपये तर चांगल्या प्रतीच्या सफरचंदाचे दर 100 रूपये ते 200 रूपये किलोपर्यंत असल्याची माहिती विक्रेता कुमार शिरसाठ यांनी दिली.

सध्या सपरचंदाची आवक किन्नोर, सिमला व कश्‍मिरमधून येथून पुणे मार्केट व मुंबईत होत आहे. तसेच, दिवाळी असल्याने लक्ष्मी पुजेसाठी देखील फळांना मागणी होत आहे. मात्र, बाजारातील कमी दराच्या सफरचंदांची गुणवत्ता कमी प्रतीची असल्याने त्याचे दर घसरले आहेत. ते वरून दिसायला चांगले आहेत. मात्र, घरी घेऊन गेल्यावर नागरिकांचा भ्रमनिरास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. मात्र, एवढा स्वस्त दर असल्याने काही नागरिकांची त्याकडे झुंबड उडत आहे. उच्च गुणवत्ता असलेल्या सफरचंदांची मागणी होत असून त्यांचे दर 160 रूपये किलो आहेत. तर मध्यम प्रतीचे सफरचंद 100 रूपये ते 120 रूपये किलो आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कमी प्रतीचे सफरचंद 50 रूपये किलोने विकल्या जात आहे. तसेच विदेशातील सफरचंदाना मागणी होत असून त्यांचे दर 260 रूपये किलो ते 300 रूपये किलो आहे. यामध्ये न्युझीलंडचे क्विन ऍपल व साऊथ आफ्रिकेच्या ग्रीन ऍपलला देखील मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजारात मुंबईतून सफरचंदाची आवक होत आहे. मात्र, एकाच वेळी अनेक विक्रेत्यांनी सफरचंदाची खरेदी केल्याने त्यांना आणण्याचा खर्च कमी लागतो आहे. तसेच यामध्ये कमी गुणवत्ता असलेल्या सफरचंदाची आवक वाढली आहे. जास्त दिवस ठेवल्यास ते खराब होण्याची शक्‍यता असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे त्यांचे दर 50 रूपये किलो झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)