सफरचंद उत्पादनाला बर्फवृष्टीचा तडाखा

आवक थंडावली : पेटीमागे 200 ते 300 रुपयांनी भाववाढ

पुणे – काश्‍मीर खोऱ्यातील बर्फवृष्टीचा तडाखा सफरचंद उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात सफरचंदची आवक जवळपास थांबली आहे. बाजारात सध्या “कोल्ड स्टोरेज’ अर्थात शीतगृह सफरचंदाची बाजारात आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्यामुळे सफरचंदच्या एका पेटीमागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजारात सध्या 15 ते 18 किलोच्या पेटीस दर्जानुसार 900 ते 1300 रुपये भाव मिळत आहे. काश्‍मीर सफरचंदचा हंगाम सुमारे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपासून सुरू होऊन जानेवारीपर्यंत सुरू असतो. काश्‍मीरमध्ये साधारणपणे डिसेंबरमध्ये बर्फवृष्टी सुरू होते. यंदा लवकर बर्फवृष्टी सुरू झाल्यामुळे सफरचंदांचे मोठे नुकसान झाले आहे. गुलटेकडी मार्केटयार्डात सफरचंदची आवक थांबली आहे. इतरवेळी दररोज 10 ते 15 ट्रक होणारी आवक केवळ 2 ते 3 ट्रकवर आली आहे. त्यामुळे भाववाढ झाली आहे. दीड महिन्यांपूर्वी 15 ते 18 किलोच्या सफरचंदच्या पेटीचे दर 500 ते 900 रूपये होते, अशी माहिती व्यापारी करण जाधव यांनी दिली. शिवाय, बर्फवृष्टीमुळे सफरचंदाच्या वाहतूक करणारी वाहने बर्फवृष्टीमुळे काश्‍मीरमध्ये अडकून पडली आहेत. सफरचंदांनी लगडलेली झाडे बर्फवृष्टीमुळे फाटली आहेत, असेही जाधव म्हणाले.

काश्‍मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सफरचंद “स्टोरेज’ केले आहे. त्यामुहे यापुढील काळात त्याच सफरचंदाची आवक सुरू राहण्याची दाट शक्‍यता आहे. त्यानंतर परदेशातील सफरचंदाची आवक होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)