सप्टेंबर 2016 पूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाल्याची नोंद नाही-डीजीएमओ

नवी दिल्ली-29 सप्टेंबर 2016 पूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाल्याची नोंद नसल्याची माहिती डीजीएमओ (डिरेक्‍टोरेट जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) यांनी दिलेली आहे. माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

पीटीआयने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) एकात्मिक मुख्यालयाच्या डीजीएमओने म्हटले आहे, की 29 सप्टेंबर 2016 पूर्वी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याची नोंद या विभागाच्या रेकॉर्डसमध्ये नाही. एका पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. सर्जिकल स्ट्राईकची व्याख्या देऊन 29 सप्टेंबर 2016 रोजी कल स्ट्राईक हा भारतीय लष्कराच्या नोंदींमधील पहिलाच सर्जिकल स्ट्राईक असल्याचे प्रतिपादन केले आहे.

सन 2004 ते 2014 या काळात सर्जिकल स्ट्राईक केला गेला होता काय? अशीही विचारणा या प्रश्‍नात करण्यात आलेली होती. मंत्रालयाने हा प्रश्‍न एकात्मिक मुख्यालय (लष्कर) कडे पाठविला होता. त्यांनी डीजीएमओकडून माहिती घेऊन ती एकात्मिक मुख्यालयाला दिली होती आणि त्यांच्याकडून ती प्रश्‍नकर्त्याला देण्यात आली.

1 COMMENT

 1. 4 times Indian commandos crossed the LoC for surgical strikes: All you need to know
  2008 – AVENGING SOLDIER’S BEHEADING
  2011 – OPERATION GINGER
  2013 – AVENGING LANCE NAIK HEMRAJ
  2016 – URI AVENGED

  यापूर्वीही Sergical strike करण्यात आलेली होती, फक्त त्यांनी जाहिरात केली नाही.
  ह्यांना जनाचीही नाही आणि मनाचीहि लाज वाटत नाही. ज्या सैनिकांनी कर्तव्य बजावत आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्वांचाच अपमान या राज्यकार्यांनि केला आहे.
  कृपया करून खालील माहिती सविस्तर वाचा आणि डोळे उधळे ठेवा

  http://indiatoday.intoday.in/story/four-times-india-carried-out-surgical-strikes/1/783633.html

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)