सप्टेंबर महिन्यात वाहनांच्या विक्रीत वाढ 

मुंबई: सप्टेबर महिन्यात कारच्या विक्रीत अंशत: वाढ झाल्याची माहिती कार कंपन्यांकडून सादर करण्यात आली. गाड्यांची बाजारातील मागणी कमी होण्यासाठी व्याजदरात झालेली वाढ आणि ग्राहकांकडून कमी होत असणारी खरेदी हे घटक कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतातील कार बाजारात मान्सून काळात ग्रामीण क्षेत्रात गाड्या विक्री करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यांचा काहीसा प्रभाव पुढील महिन्यात बाजारात दिसून येणार असल्याचा अंदाज मांडण्यात येत आहे. केरळ राज्यात महापूरामुळे अजूनही भयाण शांतता असून तसे वातावरण पुढील दोन महिन्यांपर्यंत राहणार असल्याचे म्हटले आहे.
भारतात सर्वात मोठ्या क्षमतेने कार उत्पादन करणाऱया मारुती सुझुकीची विक्री 0.7 टक्के राहिली असून प्रवासी वाहनांची 1.51 लाख इतकी विक्री मागील महिन्यात झाली आहे.
आता रुपयाचे मुल्य मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे सुटे भाग आयात करणाऱ्या कंपन्याना आणखी दर वाढ करावी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आगामी काळातही कार विक्रीवर परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र उत्सवाचा हंगामा संपेपर्यंत कंपन्यादर वाढ टाळतील.
टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत विक्रीत 20 टक्के वाढ दर्शविली असून 64,520 युनिटस्‌ची विक्री केली आहे.गेल्या वर्षी याच महिन्यात 53,964 युनिटस्‌ची विक्री केली होती. एप्रिल ते सप्टेंबर 2018 या काळात देखील टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत विक्रीत 40 टक्के वाढ दर्शविली असून 339186 युनिटस्‌ची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच काळात 242787 युनिटस्‌ची विक्री केली होती.
हिरो मोटोकॉर्प ने सप्टेंबरमध्ये 7,69,138 युनिटस्‌ची विक्री केली. एका महिन्यात 7,50,000 युनिटस्‌च्या विक्रीचा टप्पा हा पहिल्यांदाच कुठल्याही दुचाकी उत्पादक कंपनी तर्फे पार केला गेला आहे. त्याचबरोबर हिरो मोटोकॉर्पने एका महिन्यात 7,00,000 युनिटस्‌च्या विक्रीचा टप्पा एकंदर 5 वेळा पार केला असून त्यामध्ये या आर्थिक वर्षात तीनदा पार करण्याचा समावेश आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2018 या पहिल्या सहामाहीत हिरो मोटोकॉर्पने 4.2 दशलक्ष युनिटस्‌च्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटरने सप्टेंबरमध्ये चांगली कामगिरी दर्शवित भारतीय बाजारपेठेत 12,512 युनिटस्‌ची विक्री केली असून 566 इटिऑस सीरिजच्या युनिटस्‌ची निर्यात केली आहे. म्हणजेच कंपनीने एकूण 13,078 युनिटस्‌ची विक्री या महिन्यात केली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटरने 12,335 युनिटस्‌ची विक्री भारतीय बाजारपेठेत केली होती.तर 1343 इटिऑस सीरिजच्या युनिटस्‌ची निर्यात केली होती. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात याच काळात कंपनीने विक्रीत 17 टक्के वाढ दर्शविली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)