सप्टेंबर महिन्यात मोदी चीन आणि म्यानमारच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या ब्रिक्‍स परिषदेसाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ही परिषद 5 सप्टेंबर पर्यंत चालणार असून त्यानंतर मोदी हे म्यानमार च्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय विदेश व्यवहार मंत्रालयातर्फे आज ही माहिती देण्यात आली.

भारत अणि चीन यांच्या दरम्यान डोकलाम येथे निर्माण झालेला पेचप्रसंग मिटल्याची घोषणा कालच भारताने केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आज मोदींच्या दौऱ्याची ही माहिती अधिकृतपणे देण्यात आली. चीन मधील ब्रिक्‍स देशांची ही नववी परिषद असून ती चीनच्या फुजीयन प्रांतात होत आहे.

पाच सप्टेंबरला ही परिषद संपल्यानंतर त्याच दिवशी मोदी म्यानमारच्या दौऱ्यावर जातील. ते तेथे 7 सप्टेंबर पर्यंत असणार आहेत. मोदींचा हा म्यानमारचा पहिलाच व्यक्तीगत स्वरूपातला दौरा आहे. या आधी नोव्हेंबर 2014 मध्ये ते असियान परिषदेसाठी म्यानमारला गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)