सपा-बसपा युतीमुळे भाजपला 25 ते 30 जागांचा फटका बसेल – आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाकित
लखनौ – उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी आघाडी करून लोकभेची निवडणूक लढवली तर या आघाडीमुळे भारतीय जनता पक्षाला 25 ते 30 जागांचा फटका बसू शकतो असे मत रिपब्लीकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत त्यातील 73 जागा गेल्यावेळी भाजपने जिंकल्या आहेत. सपा-बसपा युतीचा भाजपला फटका बसणार असला तरी राज्यातील किमान 50 जागा भाजप जिंकू शकेल असेही आठवले यांनी म्हटले आहे.

मोदींना आव्हान देऊ शकेल अशी क्षमता देशातील एकाही नेत्यामध्ये नाही असेही त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. राहुल गांधी, मायावती, अखिलेश यादव यांच्यातही ती क्षमता नाही असे त्यांनी नमूद केले. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना दलितांच्या हिताची खरीच काळजी असेल तर त्यांनी भाजप प्रणित एनडीए मध्ये सामिल व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यसभेच्या निवडणूकीत समाजवादी पक्षाने बहुजन समाज पक्षाच्या पाठित खंजीर खुपसला आहे यातून त्यांनी बोध घ्यावा आणि भाजप प्रणित आघाडीत यावे अशी सुचनाही त्यांनी केली. देशात आणि उत्तरप्रदेशात आजही दलितांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत पण त्याल भाजप जबाबदार नाही असे नमूद करून ते म्हणाले की दलितांचे संरक्षण करणारे कायदे आणखी बळकट करण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)