सपा-बसपाला विरोध नाही ; भाजप आमचा समान शत्रु -राहुल गांधी

नवी दिल्ली: आम्हाला राहुल गांधी यांच्या विषयी कमालीचा आदर आहे. पण केवळ उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी निवडणुकीचे जे गणित जमवणे आवश्‍यक होते त्यानुसार आम्ही बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली आहे आणि त्यासाठी कॉंग्रेसला दूर ठेवावे लागले आहे. तथापि निवडणुकीनंतर त्यांच्याशी एकत्र काम करण्यात आम्हाला अडचण नाही असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले होते.

याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, दोन पक्षांनी भाजपला विरोध करण्यासाठी ही आघाडी केली आहे. भाजप हा आमचा समान शत्रु आहे. मी समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्षाला विरोध करीत नाही त्यांच्या विषयी आमच्या मनात शत्रुत्व नाही. त्यांच्याशी एकत्र काम करण्याची आमची तयारी आहे. पण उत्तरप्रदेशात आम्हाला आमच्याही पक्षाची विचारसरणी पुढे न्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)