सपा बरोबरच्या आमच्या मैत्रीत स्वार्थ नाही

मायावतींचा दावा, भाजपचा आरोप फेटाळला
लखनौ – भारतीय जनता पक्षाला केंद्रात पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्याची गरज असून त्यासाठी सर्व भाजप विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्या भूमिकेतूनच आम्ही समाजवादी पक्षाशी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. आम्ही जी राजकीय मैत्री केली आहे त्यात स्वार्थ नाही तर देशहित आहे असे समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील मैत्रीचे साऱ्या देशभर स्वागत झाले आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. आमच्या आघाडी बाबत भारतीय जनता पक्षाने अपप्रचार चालवला असला तरी आमचे कार्यकर्ते त्याला बळी पडणार नाहींत असेही मायावती यांनी नमूद केले.

मोंदीचे सरकार हे दलित विरोधी सरकार आहे असे नमूद करून त्या म्हणाल्या की काल मन की बात मधून पंतप्रधांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे कौतुगोद्‌गार काढले ती केवळ लोकांमध्ये धूळफेक करण्याच्या प्रकाराचा एक भाग आहे. गेली चार वर्षे त्यांच्या सरकारने दलित आणि मागासांच्या बाबतीत केवळ नाटके केली असा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचे तत्व रूजवण्याचा प्रयत्न केला पण भाजप आणि संघाच्या या राजवटीत आणि त्यांच्या मानसिकतेत समानतेचे तत्वच अस्तित्वात नाहीत. त्यामुळेच लोकांनी भाजपला इतकी वर्षे सत्तेपासून दूर ठेवले होते असा दावाही त्यांनी यावेळी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)