सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ, एकाचा मृत्यू 

पाटणा  – हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या कार्यक्रमावेळी उडालेल्या गोंधळानंतर झालेल्या लाठीचार्जमध्ये एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला. बिहारमधील बेगूसराय येथे गुरूवारी तिच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे उडालेल्या गोंधळात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

उत्तर भारतात सपना चौधरीचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यामुळे बेगुसराय येथील कार्यक्रमाला सपनाच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. ती तिच्या कार्यक्रमासाठी पोहचली तेव्हा आयोजकांना गर्दी आटोक्‍यात ठेवणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला.

गर्दी नियंत्रणात आणणे शक्‍य नसल्याचे आयोजकांच्या लक्षात आल्यानंतर आयोजकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नाईलाजास्तव पोलिसांना गर्दीवर लाठी चार्ज करावा लागला.

दरम्यान, बेगुसराय येथे छट पुजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये परफॉर्म करण्यासाठी सपना चौधरीला आंमत्रित करण्यात आले होते. सपनाला पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी जमली होती. सदर परिसरात क्षमतेपेक्षा अधिक पटींनी गर्दी झाली होती. त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)