सपकाळवाडी सरपंचांवर अविश्‍वास

पाचविरुद्ध दोन मतांनी ठराव मंजूर

भवानीनगर- सपकळवाडी(ता इंदापूर) ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी सोपान सपकळ यांच्या विरोधात पाच विरुद्ध दोन मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला. एकूण 10 कारणे देत हा अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला.
सरपंच सपकाळ यांच्यावरील अविश्‍वास ठरावासाठी शुक्रवारी (दि. 16) सकाळी 11 वाजता सपकळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी काम पाहीले. त्यावेळी अविश्‍वास ठरावाची कारणे तहसीलदारांनी सर्व सदस्यांना वाचून दाखविल्या नंतर सरपंचावरील अविश्‍वास ठरावासाठी हात वर करुन मतदान घेण्याचे तहसीलदार यांनी ठरविले. त्यानंतर सचिन सपकळ, शत्रुघ्न घाडगे, सविता अवघडे, त्रिवेणी सपकळ, व गितांजली वाघमारे या पाच सदस्यांनी हात वर करुन अविश्‍वास ठराव मंजूर करण्यास समंती दिली तर ठरावाच्या विरोधात सरपंच शिवाजी सोपान सपकळ व प्रभावती सपकळ या दोन सदस्यांनी मतदान केल्याने पाचविरुद्ध दोन मतांनी सरपंच सपकाळ यांच्यावरील अश्‍वास ठराव मंजूर झाल्याचे तहसीलदार मेटकरी यांनी जाहीर केले. सचिन सपकळ म्हणाले सरपंचावर अविश्‍वास ठराव मंजूर झाल्याने सपकळवाडी ग्रामपंचायतीवर शिवाजी नथु सपकळ, शिवाजी जगन्नाथ सपकळ व सचिन अशोक सपकळ गटाचे वर्चस्व आले आहे. दीडवर्षां पासून गावचा विकास खुंटल्याने ग्रामस्थांनीच आघाडी करुन सरपंचांवर अविश्‍वास आणण्याची मागणी केली होती, व अखेर ती पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

  • या कारणांसाठी घेतला ठराव
    ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच विश्‍वासात घेत नाहीत. गावच्या विकासाची कामे करीत नाहीत. पंचायत समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करतात. अधिकाराचा दुरुपयोग करतात व मनमानी कारभार करतात. सहकारी सदस्यांना अपमानकारक वागणूक देतात. सदस्यांच्या मासिक हजेरी रजिस्टरला खोट्या सह्या करतात. मासिक मिटींग दर महिन्याला घेत नाहीत. ग्रामसभेचे प्रोसिडिंग करित नाहीत. ग्रामपंचायतीचे धनादेश (चेकबुक) पुस्तक स्वतः जवळ ठेवतात.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)