सनी लिओन बनली फेसबूकवर ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी’

बॉलीवूड सेन्सेशन सनी लिओन फेसबूकवर ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी’ बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टच्या अनुसार, फेसबुक वर सनीला सर्वाधिक सर्च केले जात असल्याची बाब समोर आली.

बाकी बॉलीवूड सेलिब्रिटींना मागे टाकत सनी 100 गुणांसह सर्वाधिक चर्चिली गेलेली फेसबुक सेलिब्रिटी असल्याचं आढळून येते आहे. ‘सुई धागा’ फेम अनुष्का शर्मा 90 गुणांसह ‘मोस्ट एंगेंजिंग फेसबुक सेलिब्रिटी’च्या ह्या यादीत दूस-या स्थानावर आहे. तर माधुरी दीक्षित 86 गुणांसह तिस-या, प्रियंका चोप्रा 84 गुणांसह चौथ्या आणि जॅकलिन फर्नांडिस 83 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, “गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या करनजीत कौर ह्या वेबसीरिजीमूळे सनीची लोकप्रियता खूप वाढली होती. त्यातच तिचा रणविजयसोबत स्प्लिट्सविला सीझन 11 हा शो लाँच झाला. आणि मग तिची डिजीटल माध्यमांमध्ये लोकप्रियता खूप वाढली. ह्यामूळेच मग ती फेसबुक वर सर्वाधिक सर्च होऊ लागली. फेसबुकवर तिच्याविषयी पोस्ट आणि रिपोस्ट झाले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)